व्हिटॅमिन C चे फायदे

तुमच्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’चा समावेश किती आहे?

जीवनसत्त्वांचे खूपच आरोग्यदायी फायदे आहेत जे आपल्या अन्नातून आपल्याला रोजच मिळाले पाहिजेत. तज्ज्ञांच्या मते बहुतेक जीवनसत्त्वे शरीराच्या अनेक यंत्रणांना सुविधा देतात आणि कार्य करतात जी कोणत्याही इतर पोषक तत्वांनी करता येत नाहीत. तसेच विविध रोग टाळण्यासाठी आणि उपचार करण्याची त्यांची क्षमता ही कुठल्याही फास्ट फूड अन्नामधून आपल्याला मिळणार नाही. योग्य अन्नपदार्थ खाणे आपल्या शरीरास व्यवस्थित कार्यरत ठेवते, आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक द्रव्यांचे रोजच्या रोज सेवन हे झालेच पाहिजे. आपल्या शरीरातील योग्य जीवनसत्त्वे चांगली असणे आवश्यक आहे, असे केल्याने आपल्या ऊर्जा स्तरात आणि रोग दूर करण्याची क्षमता वाढते.


अनेक गोेष्टींची आपण नेहमीच काळजी घेताच असतो, तसेच आज बरेच जण तब्येतीच्या बाबतीत खूपच जागरूक झालेले आहेत. पण त्यासाठी नेमकं काय करायचं? आपल्याला त्यासंदर्भात काय काळजी घ्यायची हे पूर्णपणे माहीत झालं आहे का? आरोग्यासंदर्भातली आपली जाणीव वाढली आहे हे जरी खरे असले तरी नेमकं काय करायचं याबाबतीत अजून नॉलेज असणे खूप गरजेचे आहे. 

साधी गोष्ट व्हिटॅमिन आणि मिनरल्सची आहे. आपल्या शरीराला या गोष्टींची किती आवश्यकता आहे आणि त्यांचं महत्त्व काय, आहारात त्याचा नेमका किती समावेश असावं याबाबतीत तसे बरेच लोकांना कमी माहित असते. शरीराला अत्यंत आवश्यक व्हिटॅमिन सी बरेच जण पुरेसं घेत नाही आणि त्यामुळे इम्युनिटी कमी होऊन आरोग्याच्या अनेक तक्रारींना आपल्याला सामोरं जावं लागतं असं संशोधकांचं, म्हणणं आहे. संपूर्ण वर्षभर आपल्या आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश असायलाच हवा. आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी हे सर्वात सुरक्षित व प्रभावी आहे. 

सिट्रस / लिंबूवर्गीय फळांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून असायला हवा आणि अशी फळे ही नेहमी मार्केट मध्ये वर्षभर उपलब्ध असतात. जेंव्हा आपण कुठेही बाहेर जातो तेंव्हा इतर कुठले सॉफ्ट ड्रिंक पिण्यापेक्षा एक ग्लास लिंबू पाणी प्यायलात तरी त्याचा कितीतरी पॉसिटीव्ह इफेक्ट आपल्या शरीराला मिळेल. या गोष्टी आपण लक्षात ठेवून जर वागलो तर नक्कीच आपलेच आरोग्य चांगले राहणार आहे. आपली त्वचा, हाडं, सांधे, लिगामेण्ट्स, दात.. यासारख्या अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.


Regards

व्हिटॅमिन C चे फायदे
व्हिटॅमिन C चे फायदे 

 

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या