बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

रोज तुम्ही किती हालचाल करता?

रोज तुम्ही किती हालचाल करता?

आजची जीवनशैली ही कॉम्प्युटर समोर बसून काम करण्याची आहे, लोक १० ते १२ तास कॉम्प्युटरसमोर बसून काम करत आहेत पण त्याच बरोबर शरीराची हालचाल खूपच कमी होत आहे. आज बहुतेक सर्व आवश्यक वस्तू आपल्याला घरी बसून मिळत आहेत. पायी चालणे कमी होऊन लोक गाडीने फिरू लागले आहेत. अशामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण खूपच कमी होऊन ओबेसिटीचे प्रमाण खूप वाढले आहे. पण हे असं काहीही असलं तरी तज्ज्ञांच्या मते आपल्या शरीराची किमान हालचाल रोज झालीच पाहिजे. ही अशी आत्ताची जीवनशैली संपूर्ण वर्षभर अशीच फॉलो केली जात आहे. पण अशा जीवनशैलीमुळे बरेच जण त्यांच्या शरीराचं नुकसान करून घेत आहेत आणि अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत.


आपल्या आजूबाजूचे वातावरण कसेही असले तरी आपण जाणीवपूर्वक नेहमीच्या अॅक्टिव्हिटीज सुरू ठेवल्या पाहिजेत. रनिंग, वॉकिंग, स्विमिंग यासारख्या आपल्या नेहमीच्या अॅक्टिव्हिटीज करणे आपल्यासाठीच फायद्याचे आहे. पण जर हे जमत नसेल तर घरी काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढून शरीर तंदुरुस्त राहण्यास खूपच मदत होईल. आपल्या शरीरातील सर्व ऑर्गन्स चांगल्या प्रकारे कार्यरत राहण्यााठी त्यांचा उपयोग होईल.


तज्ञांच्या म्हणण्यानुसार आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा दिवस कसाही असो रोज किमान सहा ते आठ तास झोप प्रत्येकानं घेतलीच पाहिजे.  कारण त्यावरच तुमची दुसऱ्या दिवशी लागणारी संपूर्ण एनर्जी आणि ऊर्जा अवलंबून असते. जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर तुमची डायजेशन पॉवेरही कमी होत जाते, इम्युनिटी पॉवर कमी होऊन इन्फेक्शनचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवा. आपल्या शरीराची काळजी घेणे हे सर्वप्रथम आपल्यापासून सुरु होते. डॉक्टर नेहमीच आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी चांगले सल्ले द्यायला नेहमीच तयार असतात पण त्या सल्ल्यांचे पालन शेवटी आपल्यालाच करावे लागते, म्हणूनच म्हटले आहे की आपले आरोग्य हे आपल्याच हातात आहे. 


Regards

रोज तुम्ही किती हालचाल करता?

रोज तुम्ही किती हालचाल करता?

 

(Image From) https://goo.gl/WPQ3X1
Fill the following link for the inquiry:  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...