नर्व्हस झालात, अस्वस्थ वाटायला लागलं तर करून पाहा हे सोप्पे उपाय

नर्व्हस झालात, अस्वस्थ वाटायला लागलं तर करून पाहा हे सोप्पे उपाय..

आपले रोजचे आयुष्य जगताना आपल्याला अशी सिच्युवेशन कधीतरी येते जिथे अनेकदा कुठल्यातरी चिंतेनं आपल्याला घेरलं जातं. अस्वस्थ वाटायला लागतं, नर्व्हसनेस वाढतो, अनइझी व्हायला लागतं.. काय करायचं ते सुचत नाही. अशावेळेस डॉक्टरची मदत घेतली तर कधीही चांगलेच पण बऱ्याचदा आपण स्वतः अशा सिच्युवेशनमध्ये चिंतेला आपल्यापासून दूर करू शकतो. या चिंता जशा अचानक आपल्या समोर येतात तशाच आपण त्यांना काही मिनिटांमध्ये दूरही पळवून लावू शकतो.

तुम्हाला जर अस्वस्थ, नर्व्हस वाटायला लागलं, तर आपल्या समोर अशी काही डिफिकल्ट सिच्युवेशन आहे आणि ती आपल्याला आणखीनच नर्वस करते आहे हे पहिले आधी तुम्ही एकसेप्ट करायला पाहिजे. अशी क्रिटिकल सिच्युवेशन आपल्याला त्रास देत आहे हे मान्य करा आणि त्याला सामोरे जा. या अशा भावनेशी झगडा करू नका, त्याला प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका. या भावनेशी युद्ध छेडाल, तर आणखीच त्रास होईल. त्यापेक्षा थोडा वेळ शांत बसा. स्वत:शीच संवाद साधा. ही स्थिती काही वेळापूर्तीच आहे आणि थोड्याच वेळात ती जाईल असं स्वत:ला बजावा. जर तुम्ही असे केलेत तर नक्कीच थोड्याच वेळात तुमचं नैराश्य आणि उदासिनता दूर होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ही अशी वेळ का आली, कशामुळे आली हे शांत डोक्याने विचार केल्यानेच आपल्या स्वत:चं स्वत:लाच कळून येते. त्याचे कारण गंभीर आहे की अगदीच नॉर्मल आहे हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं. तसं नाही आलं लक्षात, आणि ती एखादी गोष्ट तुम्हाला सारखी त्रास देत असेल तर मग मात्र डॉक्टरचा सल्ला घेणे केव्हाही चांगलेच ठरेल. 

पण नेहमीच तुमच्या बरोबर डॉक्टर अव्हेलेबल नसणार पण त्यांनी सांगितलेल्या उपायांनी तुम्ही भविष्यात येणाऱ्या कोणत्याही  तणावावर, चिंतेवर मात करण्याचा उत्तम उपाय म्हणजे ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा. फिरायला जा, म्युझिक ऐका, तुमचे आवडते काम करा, काहीतरी कॉमेडी वाचन करा किंवा कॉमेडी सीरिअल पहा किंवा मोबाइलमधले फनी व्हीडीओज पाहा. ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, असं काहीतरी करा. तणाव निर्माण करणाऱ्या अशा परिस्थितीतून स्वत:ला पूर्णपणे बाहेर काढा. थोड्याच वेळात तुमचा मूड नॉर्मल होईल.


Regards

 

(Image From) https://goo.gl/uGbBGR
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या