ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम

ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम

सध्याच्या दिवसभरातील कामामुळे आणि घडणाऱ्या अनेक घडामोडींमुळे प्रत्येक व्यक्तीला थोड्या प्रमाणात ताण हा येतोच. त्यामुळे रोजच्या कामांसोबत शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. ह्या अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या ताणाची नेमकी लक्षणं समजून घेणं फार आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच उपाय करून आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामांवर वेळीच उपाय करता येतील. दिवसभरातील काम आणि घडणाऱ्या घडामोडींमुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक ताण येतोच.

डोकं, छाती, पोट दुखणं

जर दररोजच्या ताण-तणावाच्या पातळीत वाढ झाली की मायग्रेन सारखे गंभीर समस्या होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला ताण असेल तर डोकेदुखी, छातीत वेदना जाणवणं, पोटात दुखणं अशा समस्या उद्भवण्यास सुरवात होते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.

 

पचनाच्या समस्या

अधिक ताणामुळे मळमळ आणि उल्टीच्या तक्रारी होऊ शकतात. ह्या अशा गोष्टींमुळे साहजिकच त्या व्यक्तीला कालांतराने पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
मानसिक लक्षणं
अति ताणामुळे डिप्रेशन,राग येणं,चिडचिडेपणा, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत न होणं, स्मरणशक्ती कमी होणं, योग्य निर्णय न घेऊ शकणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हृदयाची गती आणि रक्तदाबावर परिणाम 

सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सर्वात जास्त लोकांना हृदय विकाराच्या समस्या जास्त प्रमाणात झालेल्या आढळून येत आहेत.

इतर समस्या

जर मानसिक आणि शारीरिक तणाव वाढला तर आकस्मिक हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते आणि ह्या संबंधीच्या अनेक बातम्या आज कानावर येत आहेत. ताण अचानक वाढला की हार्मोनवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे अनेकदा हृदयाची गती वाढून  रक्तदाब वाढण्याचे प्रकार हल्ली खूपच वाढू लागले आहे. तसेच ओव्हरवेट व्यक्तींना ह्याचा जास्त धोका आहे.
ताण-ताणवाचा परिणाम हा फक्त शारीरिक क्रियांवर न होता मानसिक क्रियांवरही होतो. यावेळी महिलांना अनियमित मासिक पाळी किंवा पाळीदरम्यान वेदना होण्याच्या तक्रारी उद्भवतात.


Regards 

(Image From) https://goo.gl/no3dWB

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या