ब्रेकफास्ट टाळाल, तर वजनावर राहणार नाही कंट्रोल!

ब्रेकफास्ट टाळाल, तर वजनावर राहणार नाही कंट्रोल!

आजच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच जणांचे शेड्युल हे सकाळी लवकर चालू होते आणि रात्री उशिरा संपते, ह्या अशा धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे लक्ष्य देणे हेही तितकेच महत्वाचे आहे. पण कुठेतरी काही गोष्टी मिस आऊट होतात आणि आरोग्य बिघडू लागते आणि ह्यात मिस आऊट होणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळचा ब्रेक फास्ट. दिवसभर खूप काम आहे, ऑफिसमध्ये खूप लवकर जावं लागतंय आणि उशिरापर्यंत थांबावं लागतंय त्यामुळे वेळेवर आणि पुरेसा ब्रेकफास्ट घ्यायलाही वेळ मिळत नाही. अशातच बरेच जण ऑफिसमध्येच जाऊन त्यांच्या डेस्कवरच काम करताना खाऊन घेतात. तर बरेच जण काही न खाताच डायरेक्ट दुपारचे जेवण घेतात, जर तुम्ही सकाळी काहीच न खाता थेट जेवणच करत असाल तर मग तुम्ही फार मोठी चूक करताय हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रत्येकासाठी सकाळचा नाश्ता आवश्यक असतो. घरी भरपेट नाश्ता करूनच घराबाहेर पडलं पाहिजे. ब्रेक फास्ट न केल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहाड्रेट्स मिळत नाही आणि मग ऑफिसमध्ये पोहचल्यावर फास्ट फूडचे सेवन जास्त प्रमाणात होते ज्याने शरीराचे बिलकुल पोषण होत नाही, कॅलरीज वाढतात आणि शरीराचे कालांतराने जास्तच नुकसान होते.  

तुम्ही कितीही बिझी असले तरीही ब्रेकफास्ट टाळू नका कारण हा काही योग्य पर्याय न्हवे. सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं असलं तरीही नेहेमीपेक्षा आणखी थोडं लवकर उठून घरी ब्रेकफास्ट करूनच बाहेर पडायला हवं. हे आपल्या चांगल्या फिटनेस साठी योग्य तर आहेच शिवाय लाइफ स्टाइल डीसीजना दूर ठेवण्याचा पण एक सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच संशोधकांनी सगळ्यांनाच ब्रेक फास्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे. तुम्हाला सकाळी कितीही लवकर बाहेर जायचे असेल किंवा भूक नसेल तरीसुद्धा प्रत्येकानं सकाळी व्यवस्थित ब्रेकफास्ट केलेला असला तर तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर राहण्यास खूप मदत होईल.


सकाळचा ब्रेक फास्ट न केल्याने रात्री झालेले जेवण आपल्या शरीरामध्येच फॅटच्या रूपात स्टोअर होऊन राहते कारण आपल्या शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज लागते आणि जर ब्रेकफास्ट स्किप झाला तर ती ऊर्जा आपल्या शरीरातूनच वापरली जाते. त्यामुळे दिवसा लवकर भूक लागते. कारण रात्रीच्या जेवणानंतर आपल्या पोटामध्ये साधारण १० ते १२ तास अन्न गेलेले नसते हे सतत भूक लागण्याचे मुख्य बेसिक कारण आहे.Regards


 

(Image From) https://goo.gl/erDSrJ
Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या