रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

ताण-तणावावर कशी मात कराल

ताण-तणावावर कशी मात कराल 

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच ताण सहन करावा लागतो. तसेच जर आपण पहिले तर मोठ्या शहरांमध्ये तर नागरिकांची जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने, मानसिक ताण-तणावही खूपच वाढलेले आहेत.  भविष्यात ह्याचे स्वरूप अधिक वाढलेले असेल त्यामुळेच याविषयी उपचार करण्यासाठी योग्य असे प्लँनिंग करण्यासाठी मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञांनी भर दिला आहे. तसेच मोठ्या शहरांमध्ये हवेचे पोल्युशन ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे नेहमीच हवेमध्ये बदल होवून व्हायरल आजारांचे प्रमाण भरपूरच वाढलेले दिसून येत आहे. तसेच वाढत्या वजनाच्या समस्येमुळे अनेक लोकांची इम्युनिटी पॉवर कमी होत चालली आहे.

तसेच रुग्णालयांंमध्ये वापरण्यात येणारी हायटेक वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रणा कमी पडू लागली आहे कारण आजारी लोकांचे प्रमाण हे दार दिवशी वाढतच आहे. तसेच आज बरेच लोक हे दिवसातले १० ते १२ तास घराबाहेर कामावर असतात आणि उरलेला वेळ ते मोबाइल किंवा टीव्ही पाहत बसतात त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे बऱ्याच लोकांना वेळच मिळत नाही त्यामुळे मग कालांतराने अशा लोकांना हेल्थ प्रॉब्लेम सुरु होतात आणि अशांची संख्या खूप मोठी आहे. म्हणूनच जर आपण जर काही गोष्टी जर नीट पाळल्या तर आपण नक्कीच एक चांगले हेल्थी आयुष्य जगू शकतो.

कारण आज अनहेल्दी लोकांची संख्या खुपच वाढत आहे आणि त्या मानाने डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. अशावेळेस आपण जर आपल्या शरीराची आणि मनाची नीट काळजी घेतली तर डॉक्टरांवरील ताणही कमी होईल. आपण रोज ६ ते ८ तास झोप घेतली पाहिजे, योग्य अन्न खाल्ले पाहिजे आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे. तसेच मनःशांतीसाठी योग शिकले पाहिजे. जर आपण हे केले तर आपले मानसिक आणि शारीरिक आयुष्य नक्कीच सुधारण्यात मदत होईल. ह्या सर्व गोष्टी सहज शक्य आहेत आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे तरच एक हेल्दी आयुष्य आपण अनुभवू शकतो.Regards 

(Image From) https://goo.gl/jFCa85
Fill the following link for the inquiry:  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...