रोज किती कॅलरीज जाळता आणि किती कॅलरीज सेवन करता?

तुम्ही रोज किती कॅलरीज जाळता आणि किती कॅलरीज सेवन करता?


आजच्या फास्ट लाइफमध्ये जर आपल्याला फिट राहायचं तर वर्कआऊट करायलाच पाहिजे, घाम गाळायला आणि कॅलरीज जाळायलाच पाहिजेत. तरच आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले राहू शकतो. तुमचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पहिली पायरी आहे ती म्हणजे तुमच्या मनाची तयारी असणे आणि वर्क आऊट करणे. पण अशातच अनेक जण विचार करतात, आपण इतका वर्कआऊट करतोय, इतका घाम गाळतोय, आता आपण काहीही खाल्लं तरी चालेल. कोणतेही पदार्थ खाऊ शकतो, पण थोड्या प्रमाणात तुम्हाला असं करता येणं शक्य आहे, पण त्याचा अतिरेक न होण्याची खबरदारी पण घेतली पाहिजे.


व्यायाम, वर्कआऊट याच्या जोडीला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे वर्कआऊटच्या माध्यमातून आपण किती कॅलरीज खर्च करत आहोत ते. पण इथे तुमच्या शरीरात कमी कॅलरीज गेल्या पाहिजेत. मात्र त्याचवेळी हेही पाहिलं पाहिजे की आवश्यक तेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरात जात आहेत की नाहीत? आपल्या शरीराच्या योग्य पोषणासाठी आवश्यक तेवढ्या कॅलरीज आपण घेतो आहोत की नाही? अशा वेळेस तुमचा ट्रेनर जे काही तुम्हाला सांगतो त्याचे योग्य पालन तुम्ही केले पाहिजे. नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम जास्त होईल. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि हे आपल्याच आरोग्यासाठी चांगले आहे.जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष्य देऊन वागलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. म्हणूनच तुम्ही आरोग्याचं एक सूत्रही इथे लक्षात ठेवायला हवं, कॅलरीज जाळायलाच हव्यात, पण आहारातून आपल्या शरीरात कॅलरी ह्या कमी असल्या पाहिजेत आणि प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, गुड फॅट्स, आणि कार्बोहाड्रेट्सचे प्रमाण जास्त असले पाहिजे. इथे एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शरीराला आकार हा आपण व्यायामानंतर काय खातो त्यामुळे प्राप्त होतो म्हणूनच म्हटले आहे की २०% वर्क आऊट आणि ८०% न्यूट्रीशन जे आपण दिवसभरात खातो ह्याकडे विशेष लक्ष्य दिलेच पाहिजे.


Regards 

Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या