टेन्शन कसे दूर करावे?

टेन्शन कसे दूर करावे?

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना आपल्याच शरीराकडे बारकाईनं लक्ष द्यायला वेळ  मिळतो का? आपल्या शरीरात केव्हा, काय बदल होतात, ते आपण नियमित ऑबझर्व करतो का? त्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष्य देतो का? आपल्या रोजच्या जीवनांत आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते आणि अशाच वेळेस आपण कधी आनंदी होतो तर कधी उदास होतो. आपण आनंदी असतो, तेव्हा आपल्या शरीरात काय बदल होतात, आपण उत्साही असतो म्हणजे आपलं शरीर नेमकं आपल्याला काय सांगत असतं? आपण दु:खी, निराश असतो, तेव्हा आपल्या शरीरात काय बदल होतात? ह्याकडे आपण कधी लक्ष्य देतो का?

आपल्या आयुष्यात चांगले आणि उदास क्षण येत असतात. आपण जेव्हा आनंदी, उत्साहात असतो, तेव्हा सगळं उत्तम असतं, पण विशेषत: आपण ज्यावेळी निराशाजनक स्थितीत, चिंतेत, काळजीत असतो, तेव्हा आपण स्वत:ला जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? असा प्रयत्न अनेकांनी केला असेल त्यामुळे त्यांना त्यामधून नक्कीच मार्ग सापडला असेल. पण इतरांनी ज्यांना असे करण्यास नसेल जमले अशांनी तसं जर केलं, तर त्यांना या चिंतेवर लगेच उपायही सापडू शकतो आणि त्यांची काळजीही दूर होऊ शकते.

ज्यावेळी तुम्ही निराश झालेले असता अशा वेळेस जर तुम्ही तुमच्या श्वासाकडे नीट लक्ष्य दिले तर असे आढळून येईल की तुमचा श्वास नेहमीपेक्षा कमी आहे आपण रेगुलर श्वास न घेता लहान श्वास घेत आहोत हे तुमच्या लक्षात येईल. अशामुळे आपली चिंता, काळजी आणखीच वाढते. त्यामुळे आपली चिंता कमी करायची असेल किंवा ज्यावेळी आपल्याला कसलं टेन्शन आलेलं असेल त्यावेळी जाणीवपूर्वक आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या श्वासावर नियंत्रण आणा. तुमच्या लक्षात येईल, आपल्या ताणाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. हा प्रयोग जर आपण वारंवार केला, तर निराशा येण्याचं आपलं प्रमाण खूपच कमी होईल आणि आनंदी, सकारात्मक आयुष्याकडे तुम्ही आपोआपच वळाल. ह्यासाठी तुम्ही ब्रीदिंग टेकनिक शिकून घ्या आणि त्याचा तुमच्या तणावाच्या प्रसंगी योग्य उपयोग करा. हे करण्यासाठी काही मिनिटेच लागतात आणि तुम्ही पुन्हा तणावाच्या प्रसंगातून नॉर्मल होता.


Regards 

(Image From) https://goo.gl/P3ePBc
Fill the following link for the enquiry:  

Post a Comment

0 Comments