कशाला करायची काळजी?

कशाला करायची काळजी?


मला आज तुम्हाला एक विचारावेसे वाटते ते म्हणजे सतत काळजी, काळजी, काळजी.. किती गोष्टींची काळजी करायची? व्यक्ती कोणीही असो प्रत्येकाला स्ट्रेस हा असतोच पण त्या स्ट्रेसला कसे सामोरे जायचे ते पूर्णपणे आपल्याच हातात असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला थोडा फार तर आपल्या कामाचा स्ट्रेस हा येतोच आणि ह्यावर मात कशी करायची हेच अनेक लोकांना सुचत नाही. त्यामुळे अनेक जण इतरांना दोष देत बसतात तसेच सतत त्याच गोष्टींचा विचार करत बसल्याने शरीरावर, मनावर वाईट परिणामही व्हायला लागतात. मग या काळजीतून बाहेर पडायचं तरी कसं? पुन्हा हसत , खेळतं, आनंदी जीवन कसं जगायचं? खरं तर कायम आनंदी कसं राहायचं? हेच सुचत नाही.


बऱ्याच जणांना वाटत असते की माझे दुख्ख खूप मोठे आहे आणि त्यांना ह्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही अशी त्याची समजूत असते. पण ह्यातून बाहेर पडण्याचे उत्तर खूपच सोपं आहे. नुसतं सोपंच नाही, तर प्रत्येकाला ते सहज जमण्यासारखे आहे. काही शास्त्रज्ञांनी नुकताच एक प्रयोग केला. ह्या प्रयोगात त्यांनी ज्या लोकांना काळजीने घेरले होते अशा लोकांच्या घरी कमी आवाजात म्युझिक सुरू करून श्वासाकडे लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि त्या सर्व लोकांना ध्यान करायला सांगितलं. त्यांना त्यांच्या श्वासाकडे लक्ष देण्यास सांगितले. खरंतर खूप पूर्वी भारतीयांनी आधीच सांगून ठेवलेला हा उपाय आहे. पण नुकत्याच झालेल्या या प्रयोगातून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की तुम्हाला कुठलीही चिंता, काळजी, टेन्शन असेल तर शांत म्युझिकच्या सोबतीनं ध्यान करा. तुमची चिंता नक्कीच दूर होऊन जाईल. आज आपण पाहतो की सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी येताना नेहमीच ट्रॅफिक लागते अशा वेळेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एखादे मेडिटेशन म्युझिक डाउनलोड करून ते रोज ऐकत जा. रात्री झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल पेक्षा मेडिटेशन म्युझिक ऐकत झोपी जा.

आत्ताच सांगितल्याप्रमाणे या प्रयोगात शास्त्रज्ञांनी तीन महिने भरपूर स्ट्रेस असलेल्या एका गटावर प्रयोग केला. त्यांच्या लक्षात आलं, या लोकांचं त्या कालावधीतलं टेन्शन ४० टक्क्यांनी कमी झालेलं होतं! ह्यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ट्रॅफिकच्या वेळेस आणि रात्री झोपण्यापूर्वी  सोशिअल मीडियावर सर्फिंग करायचे आहे की मेडिटेशन म्युझिक ऐकायचे? सारे काही तुमच्याच हातात आहे.

 

Regards

 


Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या