टेन्शन असेल, तर कॉफीचा कप आधी बाजूला ठेवा..

टेन्शन असेल, तर कॉफीचा कप आधी बाजूला ठेवा..

आजकाल आपण सगळीकडेच पाहत आहोत की बहुतेक लोक हे दिवसातले ८ ते १० तास कॉम्पुटर समोर बसून काम करतात अशातच बरेच जर हे व्यायाम करायला दिवसभरच्या स्ट्रेसमुळे टाळाटाळ करतात आणि ऑफिसामध्ये चांगले एनर्जेटिक राहून चांगल्या परफॉर्मन्स साठी रोज अनेकवेळा चहा किंवा कॉफी पितात. तसेच अशातच काही लोकांना सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी नाही मिळाली तर बैचेन व्हायला होते. फक्त सकाळीच नाही, तर ऑफिसामध्येही जर चहा कॉफी मिळाली नाही तर बैचेन व्हायला होते. अशामुळे मूड जातो, हायपर व्हायला होते, कामात नीट लक्ष लागत नाही. अनेकांना असे वाटते की एक कप चहा किंवा कॉफी घेतल्याने त्यांचा परफॉर्मन्स सुधारतो तसेच जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत सारखं अस्वस्थ वाटत राहतं.

पण संशोधकांच्या अनेक संशोधनातून त्यांनी असे शोधून काढले आहे की ज्यावेळी तुम्ही चिंतेत, काळजीत असता, कुठल्या तरी गोष्टीनं तुमची मनस्थिती बिघडलेली असते, त्यावेळी कॉफीसारख्या पेयांतील कॅफिन या घटकामुळे तुमचं टेन्शन कळत नकळत आणखी वाढतं. तसेच ह्याच्या अधिक सेवनाचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जर कुठल्या काळजीत असाल, त्या काळात कॉफीचं सेवन जाणीवपूर्वक कमी करा. ते शक्य तितकं कमी किंवा शुन्यावर आणलं तर खूपच चांगलं. ज्यावेळी तुमच्या शरीरात कॅफिन जातं, त्यावेळी तुमच्या शरीरातील संप्रेरकांमध्येही वाढ होते. तुम्ही आधीच टेन्शनमध्ये असाल, तर ही संप्रेरकं तुमचं टेन्शन वाढवण्यात मदतच करतात. त्यामुळे टेन्शन असेल, तर कॉफीचा कप घेण्यापेक्षा पाणी प्या किंवा ड्राय फ्रुट्स खा. ताणापासून मुक्ती हवी असेल तर ब्रीदिंग टेक्निक शिकून घ्या नक्कीच फायदा मिळेल.

Regards


 

(Image From) https://goo.gl/PHWD2Y
Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या