सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

आऊट डोअर खेळ आरोग्यासाठी उत्तम व्यायाम

आऊट डोअर खेळ आरोग्यासाठी उत्तम व्यायाम 


आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा खूप खेळ खेळतो पण आजच्या सोशिअल मीडियाच्या जमान्यामध्ये   हल्लीची लहान मुले आपल्याला बाहेर मैदानात कमी खेळताना दिसून येतात. मला इथे तुम्हाला काही विचारावेसे वाटतात जसे तुम्हाला कोणता खेळ आवडतो? तुम्ही कोणता खेळ खेळता? आणि खेळ खेळायचा तरी कशासाठी?.. खेळाचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत तसेच आऊट डोअर खेळांमुळे आरोग्य चांगलं राहतं, फिटनेस वाढतो. भविष्यातील आजारपणं टाळता येतात, आपण उत्साही राहतो. कार्यक्षमता वाढते.. स्टॅमिना, ताकद वाढते असे भरपूर फायदे आहेत. खेळामुळे आपली इम्युनिटी सिस्टिम वाढते तसेच खेळामुळे  उत्तम व्यायाम घडतो आणि नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची आपली क्षमताही खूपच वाढते.

 


या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण खेळाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळामुळे आपल्या शरीर-मनावरचा ताण खूपच कमी होतो आणि आपण चिंतामुक्त होतो हे अनेक संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहे. लहान किंवा मोठे जर तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे कोणतेही आऊट डोअर खेळ खेळत असाल, तर तुमच्या आरोग्यासाठी तर ते फायदेशीर आहेच, पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ताण-तणावापासून तुम्ही दूर राहू शकता. तसेच ह्यामुळे आपल्याला अधिक प्रसन्न देखील वाटते. सध्याच्या स्पर्धात्मक जीवनात अनेकांना प्रत्येकवेळी स्ट्रेसला सामोरे जावे लागते. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेण्टचं उत्तम उदाहरण म्हणजे कुठलाही खेळ खेळणं. जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर आजच तुम्ही तुम्हाला जमेल असे आऊट डोअर खेळ खेळायला सुरुवात करा आणि मग पाहा तुमच्यात काय फरक पडतो ते..
Regards 

Fill the following link for the enquiry:  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...