रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

वर्किंग वूमन्ससाठी आहाराच्या खास टिप्स...

वर्किंग वूमन्ससाठी आहाराच्या खास टिप्स...

आजकाल जसे पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर असतात तसेच बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बहुतांश स्त्रियाही कामानिमित्त बाहेर असतात. कुटुंब आणि ऑफिस दोन्ही अगदी व्यवस्थित सांभाळतात. पण ह्या अशा सगळ्या कामांच्या आणि जबाबदारीच्या चक्रात स्वतःकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आज बऱ्याच स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे म्हणूनच स्त्रियांना घर आणि ऑफिस ह्या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या असतील तर स्वतः मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट असणे गरजेचे आहे.त्यासाठी योग्य आहार योग्य वेळी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स. ह्या टिप्स पाळल्यास दिवसभर नक्कीच एनर्जेटीक वाटेल.


नाश्ता

सकाळच्या वेळेत घाई गडबडीत नाश्ता करणे, अनेकजण टाळतात. पण सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी आवश्यक असतो. तो टाळल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते हे अनेक संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नाश्ता टाळू नका आणि शक्यतो घरगुती पदार्थच नाश्तासाठी वापरत जा. ते शक्य नसल्यास प्रवासात एखादे फळ खा किंवा फळांचा रस घ्या. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. ऑफिसमध्ये मधल्या वेळी भूक लागल्यास ड्राय फ्रुट्स खा.

दुपारचे जेवण

दिवसभर ऑफिस मध्ये आणि इतर अनेक कामे करत असल्याने जेवणातून योग्यरीत्या पोषण होणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी सात्विक, पौष्टीक आणि घरगुती अन्नपदार्थांचा आहारात सामावेश करा. पोळी-भाजी, डाळ, दही, हिरव्या पालेभाज्या यांसारखे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. त्याचबरोबर सलाड अवश्य खा.


स्नॅक्स 

आजकालचे कामाचे स्वरूप हे ८-९ तास ऑफिसमध्ये असल्याने संध्याकाळच्या वेळेसही भूक लागते. अशावेळी बाहेरचे फास्ट फूड अन्न बऱ्याचदा खाल्ले जाते, समोसा, वडा, पिझ्झा अशा अनहेल्दी पदार्थांची पोटात भर पडते. अशावेळी ड्राय फ्रुट्स, उकडलेली कडधान्ये, कडधान्यांचे सलाड अशा पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास खूपच मदत होते.

 

रात्रीचे जेवण 

भारतात रात्रीचे जेवण पोटभर घेण्याची सवय आहे. इतकंच नाही तर पोटभर खायचं आणि लगेच झोपायचं, ही अगदी अनहेल्दी सवय बऱ्याच लोकांमध्ये आढळून येते. या उलट रात्री कमी मसालेदार, आणि हलके अन्न खाल्ले पाहिजे. भाज्या, चपाती, वरण, भात असे हलके अन्नच खाल्ले पाहिजे. त्यामुळे शरीराच्या योग्य पोषणाबरोबरच अन्नपचनही सहज होण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर किमान २ तास तरी झोपू नये.


Regards


 

(Image From) https://goo.gl/kkhNKr
Fill the following link for the enquiry:  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...