झोपेचे महत्व काय आहे

आयुष्याचा आधारस्तंभ - योग्य निद्रा

आयुर्वेदाने आपल्याला नेहमीच चांगल्या आयुष्य कसे जगायचे हे सांगितले आणि त्यातलेच एक आहे, निद्रा म्हणजेच झोप याची आज माहिती घेऊया. आजच्या काळात कामाच्या प्रचंड व्यापामुळे बऱ्याच जणांना पर्याप्त झोप घेता येत नाही.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस रात्री झोपायला जातो तेव्हा बरेचवेळा मानसिक ताणामुळे त्यास झोप आलेली नसते आणि सकाळी उठतो त्यावेळी त्याची झोप पूर्ण झालेली नसते आणि हे असे प्रकार बरेच वेळा होत असतात.
कधी कधी तर  रात्रीची झोप यावी म्हणून झोपेच्या गोळ्यांचे अधिक सेवन केले जाते. काही वेळा तर पहाटेची झोप लागली की परत उठण्याची वेळ आलेली असते. ही आणि अशी बरीच करणे झोपेच्या बाबतीत सांगता येतील. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे झोपेमध्येही थोडाफार फरक जाणवतो. झोपेविषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी स्वस्थ, निरोगी व्यक्तीने कधी उठावे याची आधी माहिती घेऊया.

दिवसा कोणी झोपावे: 
दिवसा झोपू नये हे जरी खरे असले तरी त्यालाही काहीजण अपवाद आहेत. खूप बारीक, अशक्त व्यक्ती, लहान मुले, म्हातारी माणसे, शरीराने किंवा मनाने थकलेले, अशा व्यक्तींनी दुपारी झोपले तरी चालते. कारण अशा व्यक्तींना सतत ऊर्जेची आवशक्यता असते. 
दिवसा कोणी झोपू नये : 
ज्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त फार आहे. म्हणजे स्थूल व्यक्ती, नेहमी भरपूर प्रमाणात तेल, तूप खाणाऱ्या व्यक्ती, अशा व्यक्तींनी दिवसा झोपणे टाळावे कारण अशा व्यक्तींची शारीरिक हालचाल जेवढी जास्त होईल तेवढे फॅट बर्न होण्यासाठी चांगले असते.
दिवसा झोपू नये असे सांगितलेल्या व्यक्तींनी जर दिवसा झोप घेतली तर त्यांना डोकेदुखी, अंग जड होणे, भूक मंदावणे, मळमळणे, अशासारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. काही व्यक्तीण झोप आली असतानादेखील उगाचच जागरण करतात. अशा प्रकारे झोप मोडली असता डोके, डोळे जड होतात, आळस येतो, जांभया येतात, अंग मोडून येते, सतत गुंगीत असल्याप्रमाणे वाटते इत्यादी लक्षणे जाणवतात. काही व्यक्तींरना निद्रानाश हा आजार जडलेला असतो. झोपेची आराधना करूनदेखील झोप येत नाही!  निद्रानाशाने डोके जड होणे, आळस, चक्कर, अपचन, वाताचे आजार, वारंवार जांभया येणे, अंगदुखी, गळून गेल्याप्रमाणे वाटणे हे आजार होतात.
झोपेच्या या सगळ्या विचारमंथनामध्ये ज्याला जितकी सवय असेल तितकी रात्री झोप आपल्या चांगले आणि वाईट यांचा विचार करून पुरेशी घेणे आवश्यअक असते. संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की जर आपण व्यवस्थित ६ ते ८ तास घेतली तरी कित्येक आजारांना दूर ठेवू शकतो, म्हणूनच जर झोपेविषयी कुठलीही तक्रार असेल तर ती इग्नोर करू नका वेळीच तिचा इलाज करा.

Regards

 


(Image From) https://goo.gl/WKHdaf  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या