गाडी चालवताना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतील हे उपाय

गाडी चालवताना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतील हे उपाय

मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये ट्राफिक ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे. तसेच इतरही शहरे आहेत जिथे ट्रॅफिक ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. आपल्या घरून सकाळी कामासाठी निघाल्यावर अनेकदा ट्राफिकला तोंड द्यावे लागते आणि अशावेळेस अनेक चालकांचे रागावरील नियंत्रण सुटते.  कामाच्या ठिकाणी केवळ ट्राफिकमुळे पोचण्यास उशीर होत असेल तर तुमचाही रागाचा पारा चढतोय का ? मग तुम्ही स्वतःला शांत करण्यासाठी या काही गोष्टींची मदत घेऊ शकता.
आपल्या भारत देशात योगाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्याच योगसाधनेच्या मदतीने रागावर नक्कीच नियंत्रण ठेवता येऊ शकते. ट्रॅफिकमध्ये जर तुम्ही रोज अडकत असाल तर मी जे सांगतोय ते कदाचित तुम्हाला सुरवातीला कठीण वाटेल पण सरावाने नक्कीच जमण्यासारखे आहे मनाला शांत ठेवण्यासाठी,ताण तणाव आणि रागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जेंव्हा गाडी काही वेळासाठी थांबेल तेंव्हा तुम्ही जाणीवपूर्वक डोळे मिटून तुमच्या दोन आयब्रोमधील म्हणजेच तिसरा डोळा समजला जाणाऱ्या भागावर लक्ष ठेवा, जेणेकरून तुमचे लक्ष्य ट्रॅफिककडे न जाता काही काळासाठी ह्या प्रक्रियेकडे वळेल.

ट्राफिकमध्ये अडकल्यास काय कराल ?  

दीर्घ श्वास घ्या  

जसजसा तुमचा रागाचा पारा वाढतोय असं दिसेल तसे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात करा. ५-६ दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना १० अंक मोजा. श्वास सोडल्यानंतर पुन्हा १० अंक मनातल्या मनात मोजायला सुरूवात करा. श्वास घेण्यापेक्षा उच्छवास सोडण्याची प्रकिया थोडी दीर्घ ठेवा. असे केल्याने तुमचे लक्ष्य रागावरुन दूर होऊन श्वासाकडे केंद्रित होईल आणि राग आपोआपच शांत होईल.   

राग, ताणतणाव, नकारात्मक विचार अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे असल्यास हाताची मुठ आवळून किमान ५-१० मिनिटे रहा. यामुळे रागावर नियंत्रण राहण्यास खूपच मदत होईल.


Regards


 

(Image From) http://mzayat.com/single/32806.html

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या