मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

रोजच्या कामातून 'असा' करा व्यायाम

रोजच्या कामातून 'असा' करा व्यायामसध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही अनेकांची समस्या आहे आणि सध्याच्या या प्रेझेंटेबल जीवनामध्ये आपण निटनेटके राहण्याबरोबर आपल्या शरीराच्या फिटनेसकडेही लक्ष देणं तितकच महत्त्वाचं आहे, हे बरेच जण जाणून आहेत आणि ह्यातील बरेचसे लोक हे दिवसभर कंप्युटरसमोर बसून काम करणारे आहेत. पण या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी ह्या आहेत काही खास टिप्स तुमच्यासाठी:

) चालण्यासारखा सगळ्यात सोप्पा व्यायाम ह्या जगात शोधून सापडणार नाही, म्हणून  आपण दररोज थोडं तरी चाललं पाहिजे कारण  चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. याने आपलं वजन कमी  आणि कंट्रोल होण्यास मदत होईल.

) चालणं तर प्रत्येक जण करू शकतो पण त्यातही वेळ काढून जर तुम्ही रोज स्विमिंग करायला गेलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहे कारण स्विमिंग केल्यानेही वजन कमी आणि कंट्रोल होण्यास मदत होईल आणि त्याने आपली सहनशीलताही वाढेल.

) पुन्हा मी येथे चालण्याचा उल्लेख करेन, चालणं तर प्रत्येक जण करू शकतो पण त्यातही वेळ काढून जर तुम्ही रोज थोड्यावेळ तरी सायकल चालवलित तर तुमच वजन नियंत्रणात राहील. सायकल चालवणं सगळ्यात उत्तम व्यायाम आहे.

) लहान असो किंवा मोठी व्यक्ती सगळ्यांनाच डान्स करायला आवडतो मग इथे तुम्ही फिट राहण्यासाठी रोज आपल्या आवडत्या गाण्यावर डांन्स करा. त्याने शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. डान्स केल्याने आपलं मनही प्रसन्न राहतं आणि हल्ली बऱ्याच ठिकाणी झुंबासारखे व्यायाम प्रकार खूपच लोकप्रिय होत आहेत.

) आता मी तुम्हला जे सांगणार आहे ते फारच प्राचीन काळापासून आपल्याकडे लोकं करत आले आहेत आणि ते म्हणजे ध्यानसाधना, रोज काही वेळासाठी ध्यानसाधना करा. त्याने तुमच्या शरीरातील संतुलन साधायला खूप मदत होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ध्यानसाधना खूप फायदेशीर आहे.

) सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली स्वत:ची काळजी घेऊन तुम्हाला आवडेल त्या गोष्टी प्रमाणात करा आणि स्वतःवर भरपूर प्रेम करा ज्याने तुम्ही खूप प्रसन्न राहाल आणि नेहमी आनंदी राहाल.


Regards
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...