सोमवार, ८ जानेवारी, २०१८

गाजर खा आणि निरोगी रहा!

गाजर खा आणि निरोगी रहा!


जसे आपले वय वाढत जाते तसे आपल्या शारीरिक हालचाली मंदावतात आणिशरीराची शक्तीही कमी होत जातेती टिकून राहण्यासाठी नियमित गाजर 
खाल्लं तर खूपच फायदा होऊ शकतो हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे 
कारण गाजरानं कमकुवतपणा कमी होण्यास मदत होतेशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन A ची आवशक्यता असते त्यासाठी गाजर हे खूपच 
उपयोगी आहे.

काय आहेत गाजराचे फायदे?


गाजरानं पचनशक्ती सुधारतेह्यामधील बिटा कॅरोटिनमुळे ते कॅन्सरला 
प्रतिबंधक उपाय म्हणून उपयोगी ठरते.

बरेच जण गाजराचा ज्युस पितात पण जर गाजर कच्चं खाल्लं तर त्यानं जास्त शरीराला फायदा होतो.

थंडीच्या दिवसात शरीराला उबेची गरज असते अशा वेळेस गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.

गृहिणींसाठी एक गोष्ट म्हणजे गाजरांच्या पानांची भाजी बनवता येते ती 
बनल्यावर उरलेलं पाणी फेकून  देता ते पाऊन घ्या कारण त्यात पोषकद्रव्य असतात.

आजकाल सगळेच जण मोबाईल किंवा कॉम्प्युटर समोर तासंन तास बसून असतात अशांनी नियमित गाजर खावे कारण गाजरात  व्हिटॅमिन 
असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य तर सुधारतेच पण चष्म्याचा नंबर कमी 
व्हायलाही मदत होते.

हृदयरोग ही सध्या बऱ्याच लोकांची समस्या आहे आणि त्यावर मात 
करायची असेल तर नियमित गाजर खावे कारण गाजरात कॅल्शियमफायबर,व्हिटॅमिन सीबी असतं ज्याने हृदयरोगावरही मात करता येते.

Regards
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...