जीवनात यशाची शिखरं गाठण्यासाठी नेमकं काय कराल...?

जीवनात यशाची शिखरं गाठण्यासाठी नेमकं काय कराल...?


शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर बरेच जण आपल्या करिअरबाबत संभ्रमात पडतात आणि कुठल्या शाखेत जायचं याचा विचार करत राहतात आणि दिवसभर आपण काय करतोय, काय नाही याचा त्यांना विसर पडतो. या विचारांमुळे निराशा येते मन उदासीन होते पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आयुष्यात खरचं काही करण्याची इच्छा असेल तर काही गोष्टी अंमलात आणा, फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्षात क्रिया करा. ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींना लागू पडते. ह्यासाठीच मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्याकडे जरा नजर टाकूया.

1) संभ्रमात राहू नका

लहान मुलांच्या  बाबतीत पालकांनी पुढाकार घ्यावा तर मोठ्यांनी ते जर कुठल्या अडचणीत असतील तर काही करायचं असेल तर त्याबाबत संभ्रमात राहू नका. गोंधळात राहणे हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या वाढीसाठी सगळ्यात मोठी अडचण निर्माण करते, त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर यातून बाहेर पडा. तेच तुमच्यासाठी फायद्याचे आहे हे नेहमी लक्षात ठेवा. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा एक एक गोष्टींचा संयुक्तपणे विचार करा त्याने तुमच्या मनातील गोंधळ कमी होईल आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल.

2) नेहमी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करा

रोज उठून एकच काम करण्याची बऱ्याच लोकांना सवय असते पण जर तुम्हाला आयुष्यात खरंच काही वेगळं करायचं असेल तर काहीतरी  नवीन करण्याचा प्रयत्न करा कारण यशस्वी होण्यासाठी आपल्यातलं वेगळेपण खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही त्यांना ज्ञात असेलेल्या गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करते आणि समाजात नाव कमावते म्हणून ती इतरांपेक्षा वेगळी ठरते हे नेहमी लक्षात ठेवा.

3) आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्या आणि जोखीम पत्करा

जगातले ९५% लोक हे त्यांच्या जीवनात कुठलीच जोखीम घेता त्यांचे आयुष्य जगत असतात आणि हे मी नाही तर तज्ज्ञांच्या जागतिक संशोधनाने सिद्ध झालेले आहे, तुम्हाला खरंच यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल तर परिणामांचा विचार करता जोखीम पत्करायला शिका. जर तुम्ही कुठल्याही यशस्वी व्यक्तीची यशोगाथा पाहिली तर त्या व्यक्तीने आयुष्यात घेतलेल्या काही जोखमींमुळेच ती यशस्वी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल.घाबरण्यापेक्षा धैर्याने सगळ्या गोष्टींना सामोरे जा आणि लोक काय म्हणतील ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा.

4) सगळ्यांशी भेटा, बोला, अनुभव घ्या आणि आपले ज्ञान वाढवा

आपल्याला काही वेगळं करायचं असेल तर ज्ञान, अनुभव असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना भेटा जी त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे, अशा जमेल तितक्या सगळ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचा अनुभव जाणुन घ्या, आणि अशांना भेटण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे त्यांच्या सेमिनारला जा. याने आपण अनेक पॉझिटिव्ह अनुभव प्राप्त करून आपले सुद्धा ज्ञान लोकांपर्यंत पोहचवू शकतो.

5) यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा


पुस्तकासारखा मित्र ह्या जगात शोधून सापडणार नाही हे आपण नेहमीच बघत आलोय, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी यशस्वी लोकांपर्यंत पोहचणं खूप महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये त्या लोकांवर नजर ठेवा, जे खूप यशस्वी झाले आहेत त्यांच्या सेमिनारची माहिती काढा ते कुठे आहेत तो दिवस तुमच्या नोंदवहीत लिहून ठेवा आणि त्या सेमिनारला आवर्जून हजेरी लावा. त्यांच्या यशाचा अभ्यास करा. यशस्वी होण्यासाठी वेगळा दृष्टीकोण खूप महत्त्वाचा आहे.

Regards

 


http://www.lifehack.org


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या