मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

सतत सेल्फी काढणे हा मानसिक आजार?

सतत सेल्फी काढणे हा मानसिक आजार?

तुम्हाला ऐकून जरा आश्चर्यच वाटेल पण हे खरे आहे कि सतत सेल्फी काढणे हा आता एक नवीन आजार आजच्या लोकांमध्ये आढळून यायला लागला आहे. आजकाल आपण पाहतो की तरूणाईला सेल्फीची भलतीच क्रेझ आहे. त्यामुळे अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. मात्र सेल्फीचे वेड अजून एका प्रकारे धोकादायक ठरेल.

सेल्फी काढणे हा मानसिक विकार 

तज्ज्ञांच्या मते सातत्याने सेल्फी काढणे हा एक धोका असून त्यावर वेळीच इलाज होणे गरजेचे आहे. स्मार्टफोनच्या आजच्या जमान्यात संशोधकांना ह्यावर जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागला आणि ह्या तज्ज्ञ मंडळींच्या अहवालानुसार सेल्फी काढणे हा मानसिक विकार असल्याचे सांगण्यात आले.

भारतात सेल्फी घेताना अधिक मृत्यू 

तसेच तज्ज्ञांनी ह्या सेल्फीच्या आजाराची पुष्टीही केली आहे आणि याची गंभीरता लक्षात येण्यासाठी त्यांनी काही व्यक्तींवर ह्याचा प्रयोगही करून पाहिला आहे. तसेच ह्या लोकांवर बारीक लक्ष्य ठेवून अभ्यास करण्यात आला. आपल्या भारतात हे संशोधकांचे अध्ययन करण्यात आले कारण भारतात फेसबुक युजर्स अधिक आहेत. तसेच भारतात धोक्याच्या ठिकाणांवर सेल्फी घेताना अधिक मृत्यू झाले आहेत.

ह्या माहितीवरून एकच गोष्ट लक्षात येते की सेल्फी काढणे हे एका लिमिट पर्यंत ठीक आहे पण त्याचा अतिरेक होऊ नये कारण अशा सेल्फी काढण्यात बरेच लोक आपले भान विसरतात, त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण ह्याचा जरा जास्तच अतिरेक करत आहोत. अशा लोकांना एक प्रकारचे प्रचंड मानसिक दडपण असते आणि ते म्हणजे कधी मी एकदाचा माझे फोटो सोशीअल मीडियावर अपलोड करतोय. ह्या वेडापायीच अनेकांनी आपले प्राणही गमावलेले आहेत. असे लोक कुठेही असले की प्रथम मोबाईल बाहेर काढणार आणि पहिला सेल्फी काढणार आणि असे केल्यावरच त्यांचे समाधान होते.


Regards


 

(Image From) https://goo.gl/T4znxv   


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...