रोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी सोप्या टीप्स!

रोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी सोप्या टीप्स!

लहान असो किंवा मोठी व्यक्ती आज प्रत्येकाचे रोजचे जीवन हे कमी अधिक प्रमाणात तणावयुक्त गोष्टींनी भरलेले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. परंतु, प्रत्येकवेळी तुम्ही तुमच्या ताणाला तुमच्या वरचढ होऊ देऊ नका. काही सोप्या युक्त्यांनी त्यावर मात करण्यास जाणीवपूवक शिकून घ्या आणि आता मी तुम्हाला दिवसभरात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणाऱ्या ताणावर मात करण्यासाठी काही सोप्या मेडिटेशन टीप्स देत आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर:

लहान मोठ्या शहरात आजकाल ट्रॅफिक होणे म्हणजे एक सामान्य घटना आहे अशा ट्रॅफिक मध्ये तुम्ही जर असाल तर स्वाभाविकपणे तुम्हाला ताण येतो. थोडी चिडचिड देखील होते. विशेषतः जेव्हा ऑफिसला वेळेवर पोहचायचे असते नेमका तेव्हाच उशीर होतो. अशा वेळी ट्रॅफिककडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या कृतीकडे नीट लक्ष द्या. म्हणजे जर तुम्ही गाडी चालवत असाल तर त्याकडे नीट लक्ष द्या अथवा गाणी लावून ड्रायविंग करा. गाडीत मागे बसला असाल किंवा बसमध्ये असाल तर डोळे मिटा आणि श्वासाकडे लक्ष केंद्रीत करा. असे करण्याने ताण कमी होऊन चिडचिड कमी होण्यास मदत होईल.

रुड ई-मेल आल्यावर:

सध्याच्या माहिती तंद्रज्ञानाच्या युगात बरेचसे कॉम्म्युनिकेशन हे ई-मेल द्वारे होते आणि अशातच ताण येणारे इमेल्स येणं हा आपल्या कामाचा एक भाग असतो. परंतु, अशा इमेल्सना रिप्लाय करण्यापूर्वी काही वेळ शांत बसा दीर्घ श्वास घ्या, मनात आकडे मोजा आणि जेंव्हा तुम्हाला शांत वाटेल अशा वेळेस मेलला रिप्लाय द्या. त्यामुळे ई-मेलला रिप्लाय करण्याआधी तुमचा दृष्टिकोन स्पष्ट झालेला असेल.

पार्टनरचा राग आल्यावर:

आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक वळणावर म्हणजेच वैयक्तिक आणि खाजगी आयुष्यात आपल्याबरोबर काही पार्टनर जोडले जातात, काही कायम आपल्याबरोबर असतात तर काही क्षणिक असतात, पण कधी कधी एखाद्या बाबतीत पार्टनरचा राग आल्यावर किंवा बोलण्याची इच्छा नसल्यास मौन धारण करण्याची सवय लावून घ्या आणि एका जागी शांत बसून डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि मग शांत झाल्यावर पार्टनरशी बोला अशाने तुम्ही त्याची बाजूही नीट समजून घेऊ शकाल आणि मग तुम्हाला तणावाच्या स्थितीत नक्की मार्ग सापडेल. 


Regardsटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या