शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे 


आपण टीव्ही वर नेहमीच च्यवनप्राशची जाहिरात पाहतो आणि हे च्यवनप्राश भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते कारण यातील आयुर्वेदिक घटक सध्या ऋतुमानाप्रमाणे बऱ्याच जणांना भेडसावणाऱ्या आजारांशी लढून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.


रोगप्रतिकारशक्ती सुधारते: 

च्यवनप्राश हा मुख्यत्वेकरून आवळ्यापासून बनवला जातो आणि आवळ्यातून शरीराला व्हिटामिन सी चा मुबलक पुरवठा होतो आणि हे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास खूपच मदत करते.

संशोधकांच्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार, च्यवनप्राशच्या सेवनाने अॅलर्जीमुळे होणारा दाह, पेशींना होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक पेशींचे कार्य सुधारून इंफेक्शनचे प्रमाण कमी होते.

श्वसनाच्या समस्या कमी होतात: 

च्यवनप्राश हा अनेक जडी-बुटी पासून बनवला जातो ह्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते तसेच संशोधकांच्या मते अस्थमाच्या रुग्णांसाठी च्यवनप्राशचे सेवन करणे स्वास्थ्यकारक ठरते आणि श्वसनविकारावर नियंत्रण मिळवता येते.

मेंदूचे कार्य सुधारते: 

च्यवनप्राशमध्ये आवळा, ब्राम्ही, बदाम, अश्वगंधा यासारखे आयुर्वेदीक घटक असल्यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊन आकलनक्षमता सुधारते व कोणतीही नवीन शिकण्याची क्षमता सुधारते.

हृद्याचे कार्य सुधारते: 

सध्याच्या पिढीच्या खाण्याच्या विचित्र वेळा आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकांच्या जीवनात ‘कोलेस्ट्रेरॉल’ वाढवणारे अनेक घटक आहारात येतात. ह्याचे कालांतराने वाईट परिणाम घडून येतात मात्र च्यवनप्राश खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी रक्त प्रवाहाची क्रिया सुधारून हृद्यविकार जडण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते.

 

Regards


 https://www.ebay.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे ...