रक्तदाबाची लक्षणं वेळीच ओळखा

रक्तदाबाची लक्षणं वेळीच ओळखा


सध्याच्या जीवनशैलीमुळे जगभरात दिवसेंदिवस रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार योग्य रक्तदाब हा सामान्यपणे कमाल १२० आणि किमान ८० हा समजला जातो.पण ही आकडेवारी जर वरचेवर कमी-जास्त होत असेल, तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे, हे वेळीच ओळखायला हवे. म्हणूनच ठराविक वयानंतर दर सहा महिन्यांनी स्वतःची नॉर्मल मेडिकल चाचणी करायची सवय ठेवा.

खालील लक्षणांकडे विशेष लक्ष द्या.

. एक महत्त्वाचे लक्षण लक्षात ठेवा सतत डोकं दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याकडे दुर्लक्ष करु नका.

. तुम्हाला वरचेवर खूप ताण आल्यासारखं जाणवलं, तर दुर्लक्ष करता त्याकडे नजर ठेवा, कारण कदाचित हे देखील रक्तदाब वाढीचं महत्वाचं कारण असू शकते.

. तुम्हाला दीर्घकाळ चक्कर आल्यासारखे होत आहे का, तर या तक्रारीकडे दुर्लक्ष करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे केंव्हाही चांगलेच.

. थोडेसे जरी काम केले तरी तुम्हाला खूप जास्त थकवा आला आहे, असं वाटतं असेल , तर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असू शकतो. ह्यात तुम्ही तुमचे वजन देखील तपासून पहा कारण थोड्या कामाने थकवा हा बऱ्याचदा आपल्या वाढलेल्या वजनाने देखील होतो.

. जर रेगुलर श्वास घेण्यामध्ये अडचण येत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय नाकातून रक्त येणे ही एक उच्च रक्तदाबाची समस्या आहे.

. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाबाची तपासणी करुन घेणे कधीही सोयीचे ठरते, कारण निद्रानाश हेही रक्तदाबाचेच एक प्रमुख लक्षण आहे.
Regards

http://freefitnesstips.co.uk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या