८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...

८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...


आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि ह्या समस्यांचे मूळ कारण जर शोधले तर ते आपल्या झोपेच्या वेळेमध्ये आहे. जर एखादी व्यक्ती ८ तासांची झोप घेत नसेल तर ती त्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार हे आता सिद्ध झाले आहे की आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये नियमितपणे झोप नीट न झाल्यास नकारात्मक विचारांचे प्रमाणही वाढते.
यामुळे अशा व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो. म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप ही घेतलीच पाहिजे.
तुमच्या अनेक आजारांचे मूळ झोपण्याच्या सवयीत आहे
प्रत्येक व्यक्तींची झोपण्याची एक सवय असते जसे की कुणी उताणे झोपते तर, कुणी पालथे, कुणी डाव्या कुशीवर झोपते तर, कुणी उजव्या कुशीवर. पण, तुम्ही जर पालथे झोपत असाल तर मात्र, तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण सतत पालथे झोपण्यामुळे तुम्हाला भविष्यात विविध त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते.

पालथे झोपल्यामुळे काय होऊ शकते  

कंबरदुखी

अनेक लोकांना पालथे झोपायची सवय असते अशा वेळी आपल्या शरीराची हाडे ही नैसर्गिक आकारात राहत नाही, तसेच एका समांतर पद्धतीनेही राहू शकत नाहीत. असे झाल्यामुळे कंबरेवर ताण येऊन कंबरदुखीचे त्रास होऊ शकतो.

स्नायूंचे दुखणे

पालथे झोपल्याने शरीरातील रत्काभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे विश्रांतीच्या काळात स्नायूंना रक्तपुरवठा निट न होता स्नायू दुखायला लागतात. पालथे झोपण्यामुळे सांधेदुखीचाही त्रास होतो.
मानदुखी
पालथे झोपल्यावर शरीराचा तोल नीट सांभाळला जात नाही त्यामुळे आपले धड आणि डोके यांच्यात विशिष्ट प्रकारचा ताण निर्माण होऊन मानेच्या स्नायूंना शुद्ध रत्कपुरवठा होत नाही. परिणामी मानदुखीचा त्रास व्हायला लागतो.

अपचन
पालथे झोपल्यामुळे शरीराचा सर्व भार पोटावर येऊन त्याचा परिणाम पोटातील आतड्यांवर होतो. आतड्यांवरील भार पचणक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे अपचन, पित्ताचा त्रास सुरु होतो.

डोकेदुखी

तुम्ही जेव्हा पालथे झोपता तेव्हा तुमची मान दुमडली जाते. तुम्हाला तुमचे डोके कोणत्यातरी एका दिशेलाच वळवावे लागते. त्यामुळे मानेच्या शिरांवर ताण पडतो. त्याचा संबंध डोक्याला होणाऱ्या रक्तपुवठ्याशी असतो. म्हणूनच असे झोपल्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.


चेहऱ्यावरही थकवा

पालथे झोपल्यामुळे चेहऱ्याला योग्य त्या प्रमाणात ऑक्शिजन मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येणे, पिंपल्स उठने, चेहऱ्यावर थकवा जाणवने यांसारख्या गोष्टी होतात.

Regards


(Image From) https://goo.gl/CwzzwK  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  
https://goo.gl/Wib57C

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या