बुधवार, ३ जानेवारी, २०१८

म्हणून लवकर झोपायची सवय हवी

म्हणून लवकर झोपायची सवय हवी


सध्याच्या माहितीच्या युगात आपल्याला हवी ती माहिती मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजच उपलब्ध होत आहे पण जर आपण जास्तच ह्या मोबाईलच्या चक्रामध्ये अडकलो तर कालांतराने आपल्या झोपेचेही चक्र बिघडलेले असेल ह्यात काही शंका नाही. त्यामुळे अनेकदा खासकरून जेवणाच्या वेळेकडे कमी लक्ष जाते. खासकरून रात्री झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर हे असंख्य लोक करताना दिसतात आणि अस करणं जर असेच चालू राहिले तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आता मी तुम्हाला लवकर झोपण्याने काय फायदे होऊ शकतात ते इथे सांगणार आहे.

चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतील: 

लवकर झोपण्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो आणि त्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार होऊन चेहऱ्यावरील डाग नक्कीच कमी  होऊ लागतील जेणेकरून पिंपल्ससही कमी होऊ लागतील.  

ब्लड ग्लुकोज / शुगर कमी होत नाही अथवा नियंत्रणात राहते:

संशोधनातून हे कित्येकवेळा सिद्ध झाले आहे की आपल्या शरीरातील ग्लुकोज चा थेट संबंध आपल्या झोपेशी असतो आणि ज्याची झोप अपुरी असते अशांना महिन्यातून काहीवेळा तरी ब्लड ग्लुकोज कमी होण्याची लक्षणे दिसून येतात पण जर झोप व्यवस्थित घेतली तर नक्कीच ह्यावर मात करता येऊ शकतो.

भूकेत सुधारणा होते:

कित्येकांना अपुऱ्या झोपेमुळे भूक लागत नाही, पण जर झोप पूर्ण असेल तर हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात. पण जर झोप अपूर्ण असेल तर पिझ्झा, बर्गर, नुडल्स सारखे पदार्थ खावेसे वाटतात पण झोप पूर्ण असेल तर आधीपेक्षा अधिक चांगले आणि आरोग्यदायी पदार्थ नक्कीच खावेसे वाटतील.

मायग्रेनचा त्रास कमी होतो :

जर झोप व्यवस्थित असेल तर मायग्रेनचा त्रास जाणवत नाही. जेव्हापासून तुम्ही पुरेशी झोप घेऊ लागाल तेव्हापासून चक्कर येणे, डोके दुखणे तसेच मायग्रेनचा त्रास कमी होईल.

कार्यक्षमतेत वाढ होते :

८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे तुम्ही अधिक उमेदीने, तत्परतेने काम करू शकता आणि अर्थातच तुमची कार्यक्षमताही वाढेल. तसेच तुम्हाला हे नक्की जाणवू लागेल की झोपेचा परिणाम कामावर होतो आणि पुरेशा झोपेमुळे कामही उत्तम होते.

Regards
https://blog.bufferapp.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...