रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा अवघडच बनून राहिले आहे. पण ह्याच व्यस्त जीवनशैलीतून जर आपण आपल्या खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. परंतु त्यासाठी अशा ओव्हरवेट लोकांनी जाणीवपूवक प्रयत्न केले पाहिजेत आणि काही खास टीप्सही लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेकदा आपल्याकडून आपल्याला आवडणारा  पदार्थ अधिक खाल्ला जातो आणि असा पदार्थ वारंवार कालांतराने खाल्ला गेल्यास वजनाचं गणित बिघडते. म्हणून कटाक्षाने या टीप्स लक्षात ठेवा.
१. जेवणापूर्वी किमान ३० मिनिटं आधी ग्लासभर पाणी प्यायची सवय लावा कॅलरीयुक्त पदार्थ खाण्यावर आपोआप नियंत्रण होते आणि भूकही थोडी कमी होते. जर अर्धातास आधी शक्य नसेल तर किमान तासभर आधी पाणी प्यावे. पण पाणी जरूर प्यावे.
२. जर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवणार असाल तर प्रोटिनयुक्त पदार्थांची निवड करा कारण असे पदार्थ हे पोटभरीचे असल्याने हाय कॅलेरी पदार्थांकडे तुमचे दुर्लक्ष्य होईल.
३. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच वेळा रात्री जेवायला उशीर होतो तर रात्री उशीराचे जेवण शक्यतो टाळा. रात्री उशीरा जेवणाची सवय असणाऱ्यांमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक खाण्याची सवय लागते. तसेच झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवणे गरजेचे आहे. जेवलेले अन्न पचायला पुरेसा वेळ देणे खूपच आवश्यक असते.
४. जेवताना शक्यतो लहान प्लेट आणि वाटीची निवड करावी जेणेकरून तुमचा पोर्शन कंट्रोलमध्ये राहतो.
५. एकाच वेळेस भरपूर जेवण्यापेक्षा काही तासांनी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खायची सवय ठेवा. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारायला मदत होतेच शिवाय दोन जेवणामध्ये काही खाण्याची सवय असल्यास ओव्हर इटिंगच्या खाण्यावर कंट्रोल राहतो.


Regards


 

(Image From) https://in.pinterest.com    


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या