ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही हेल्दी उपाय...

ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही हेल्दी उपाय...


सध्याच्या कॉर्पोरेट कल्चर मध्ये कामाचा ताण आणि ऑफिसचे जास्त कामाचे तास ह्यामुळे मेंदूवर खूपच ताण येतो आणि अशातच ऑफिसमध्ये दुपारी लंच ब्रेक नंतर आळसवाणे वाटणे हे तर बऱ्याच लोकांमध्ये कॉमन होऊ लागले आहे. त्यातच जर ऑफिसमध्ये दुपारी एखादी महत्त्वाची मिटिंग किंवा काम असेल तर अत्यंत त्रासदायक ठरते. अशावेळी बरेच जण झोप घालवण्यासाठी आणि चटकन फ्रेश होण्यासाठी कॉफी किंवा चहा घेणे पसंत करतात. परंतु, या व्यतिरिक्तसुद्धा काही हेल्दी आणि परिणामकारक पर्याय आहेत.
१. ऑफिसमध्ये दुपारची झोप आल्यास जागेवरून उठा, ऑफिस बाहेर पडा आणि जिने उतरा. परत चढा. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार १० मिनिटे जिने चढल्या उतरल्यामुळे ५० मिलिग्रॅम कॅफेन (चहा किंवा कॉफी ) घेण्यापेक्षा तुम्हाला अधिक फ्रेश, उत्साही वाटेल.
२. लंच ब्रेकमध्ये ऑफिस बाहेर पडा आणि सूर्यप्रकाशात फिरण्याची स्वतःला आवर्जून सवय लावा. सूर्यप्रकाशामुळे तुमचा मूड, जागरूकता आणि मेटॅबॉलिझम सुधारतो. परिणामी तुमचे आरोग्य चांगले होते.
३. कर्मचाऱ्यांना फ्रेश आणि फोकस्ड वाटावे म्हणून कंपनी व्यवस्थापकाने योग्य अशी एयर फ्रेशनर्स ऑफिसामध्ये लावली पाहिजेत. जपानमधील काही ऑफिसमध्ये ऑरेंज बेस्ड एयर फ्रेशनर्स वापरली जातात ज्यामुळे कर्मचाऱ्यांना फ्रेश वाटते आणि त्यांच्या कामात फोकस्ड राहता येते.
 ४. संगीत ऐकायला सर्वांनाच आवडते त्यामुळेच संगीत ऐकल्याने मूडही चांगला होतो, आणि हा अनुभव सर्वानीच घेतला आहे. तसेच संशोधकांच्या अभ्यासानुसार संगीत ऐकल्याने कामाची उत्पादकता वाढण्यास मदत होते आणि कामात लक्षही लागते.
५. थंड पाण्याने चेहरा व डोळे धुवा. यामुळे थकलेल्या डोळ्यांना आराम मिळेल आणि त्वचेचे पोर्स बंद होतील. म्हणून चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारा आणि मग चेहरा कोरडा करा. 

 


Regards


(Image From) https://content.wisestep.com    

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या