फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश हवाच

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश हवाच


सध्याच्या फास्ट लाइफ मध्ये बरेच जण हे पटकन आणि लागेश तयार पदार्थ खानाकडे हल्लीच्या पिढीचा जास्त काळ दिसून येत आहे पण ह्या अशा पदार्थांमध्ये फायबरची कमतरता असते आपल्या आहारात भाज्या, पालेभाज्या, फळं, धान्यं आणि कडधान्यं यांचे प्रमाण आपण वाढवले पाहिजे कारण ह्यामधूनच आपल्या शरीराला आव्यश्यक असे फायबर उपलब्ध होणार आहेत.
आपल्या खाद्यामधून आपल्याला दोन प्रकारचे फायबर मिळतात जे शरीरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे! अशा प्रकारात येतात. ह्यामध्ये न विरघळणारे फायबर न पचता तसंच बाहेर पडतात, तर विरघळणारे फायबर पोटात पाणी शोषून घेतात. न विरघळणारं फायबर आपल्याला भाज्या आणि सुका मेवा, यातून मिळतात. विरघळणारे फायबर आपल्याला पपई, संत्रं, पेरू यासारखी फळं, ओट्‌स आणि सोयाबीनचे पदार्थ यातून मिळतात.
हल्लीच्या पिढीमध्ये फास्ट फूडची क्रेज भरपूर आहे पण ह्या फास्ट फूड पदार्थांतून आपल्या शरीराला  बिलकुल फायबर मिळत नाही. म्हणूनच ते शरीराला चांगले नसतात. त्यामुळेच फास्ट फूडने रक्तातली साखर लवकर वाढते  आणि त्यामुळे वजनही वाढतं. याउलट जास्त फायबर असणारे पदार्थ हळूहळू पचतात आणि त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. याचाच अर्थ असा की फायबर जास्त समाधान देतात आणि कॅलरीजची काळजी करणाऱ्या लोकांसाठी चांगले असतात.
फायबरचे फायदे
फायबरने पोट लवकर भरतं आणि समाधानही मिळतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला याची मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते. आपल्या शरीरात प्रदूषण आणि फास्ट फूड तसंच इतर रासायनिक पदार्थ अनेक मार्गांनी रोजच्या रोज प्रवेश करतच असतात. ह्यातील अनेक घटक हे कॅन्सरला कारणीभूत ठरणारे असतात, फायबरमुळे हे हानिकारक घटक शरीरातून लवकर बाहेर फेकले जातात आणि त्यांच्या वाईट परिणामांची तीव्रता खूपच कमी होते.विरघळणारे फायबर रक्तातील कॉलेस्ट्रॉलसारखे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे रक्ताततील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ज्यांना डायबेटीस आहे अशांना रक्तातील साखरेची पातळी नॉर्मल राहण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा फार उपयोग होतो. पण फायबर कितीही चांगलं असलं तरी ते आहारात एकदम वाढवू नये, तर हळूहळू वाढवावे कारण जर एकदम वाढवले तर पोट बिघडू शकतं. त्याचा अतिरेक झाल्यास शरीराला आवश्यमक असणाऱ्या झिंक, कॅल्शियम, लोह अशा क्षारांची कमतरता निर्माण होऊ शकते.
आहारातील फायबर कसे वाढवाल?
१. फळं, भाज्या आणि सुका मेवा उदा. अंजीर, मनुका आवर्जून खावेत.
२. ज्या फळांची आणि भाज्याची साले खाता येतात, ते जरूर सालांसकट खावेत. उदा. सफरचंद, बटाटा वगैरे.
३. कच्च्या कोशिंबिरी आणि फळं यांचा आहारात समावेश असावा. तसेच धान्यं, कडधान्यं खावीत.
४. पांढरा भात आणि पांढरा ब्रेड यापेक्षा ब्राउन राइस आणि ब्राउन ब्रेडचा वापर प्रामुख्याने करावा.
५. हे सर्व करताना दिवसभरात भरपूर पाणी प्यावं म्हणजे खाल्लेल्या फायबर पदार्थांचा नीट शरीराला उपयोग होईल.

Regards


(Image From) https://in.pinterest.com   

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या