शारीरिक आणि मानसिक पोषणाचे महत्त्व!!!

शारीरिक आणि मानसिक पोषणाचे महत्त्व!!!


चांगले आरोग्य जर हवे असेल तर योग्य पोषक आहार घेणे गरजेचे आहे आणि शरीराचे योग्य पोषण म्हटले की योग्य आहार हा घेतलाच पाहिजे पण शरीराच्या पोषणाबरोबरच मनाचे पोषणसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपण टीव्हीवर अनेक अन्नपदार्थांचे पोषण मूल्य वाढवणारी नवीन नवीन उत्पादने पाहतो आणि घेतोही. पण मनाचे पोषण होण्याची गरज बऱ्याच कमी लोकांना वाटते, उलट मनाला पोषक अशा फार थोड्या गोष्टी होत असतात.

आपले संपूर्ण कुटुंब महिन्यातून एकदा सिनेमा पाहायला, दर आठवड्याला हॉटेलमध्ये जेवायला  अगदी न चुकता जातो. पण कोणी मुद्दाम मुलांना दर आठवड्याला एखादे चांगले पुस्तक वाचायला देणे, शाळेत जे विज्ञान शिकतो त्यातील पान आणि फुलांचा बागेत जाऊन अभ्यास करणे, ट्रेकिंगला जाणे, गडकिल्ल्यांची माहिती देणे, थोर लोकांची महती सांगणे असे करताना दिसत नाही आणि ह्याचे प्रमाण खूपच कमी आहे. खरेतर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते.
आपले शरीर ज्या घटकांचे बनलेले आहे, ते घटक शरीराला अखंडपणे पुरवत राहणे, हा तर एक पोषणाचा भाग आहे आणि ते तर बरेच लोक करताना दिसून येतात. रोजच्या गरजांच्या मधले भात, भाजी, वरण, पोळी हे अगदी साधे पोषण रोजच होत असते. पण आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक बारीक-सारीक पोषणतत्त्वांची गरज असते. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ समावेश करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्याचे प्रमाण किती असावे, हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

आपल्या आहारात वरण, भात, भाजी, पोळी ह्यांचा समावेश तर असावाच पण सुक्याा मेव्याचे ( ड्राय फ्रुट्स)  प्रमाण देखील असावे कारण सुक्याा मेव्यात असलेली पोषणतत्त्वे ही अतिमहत्त्वाची तर आहेतच, पण ती अतिसूक्ष्म व तुलनेने कमी प्रमाणात लागणारीही आहेत. तसेच आपल्या शरीराला लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्रोटिन्स आणि ह्यांचा मुख्य स्त्रोत म्हणजे डाळी कडधान्ये. आपल्या जेवणामध्ये याचा भरपूर प्रमाणावर वापर रोजच्यारोज करायलाच हवा. तसेच आपल्या आहारात ड्राय फ्रुट्सचे प्रमाणही योग्य असावे आणि नेहमीच हे ड्राय फ्रुट्स आलटून पालटून थोड्या प्रमाणात घेतले पाहिजेत, ज्यायोगे शरीराचे सर्वसाधारण नव्हे तर संपूर्ण पोषण होईल.
एकाच प्रकारचे जेवण न करता आपल्या आहारात नेहमीच काहीतरी बदल आपण केला पाहिजे जसे की फळे. बाजारात उपलब्ध असलेली फळे आपल्या आहारात नेहमी असावीत ज्याने शरीराचे पूर्ण पोषण होण्यास खूपच हातभार लागू शकतो. तसेच आपल्या जेवणात नेहमी वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. पालेभाज्या, सलाड, असे विविध प्रकार खावेत म्हणजे जे पोषकतत्त्व इतर अन्नातून नाही मिळाले ते ह्यातून मिळून जातील. ह्या सगळ्याचे कारण एकच की एक प्रकारच्या अन्नधान्यात जे नाही ते दुसऱ्यात आहे. अशा पद्धतीने आपण शरीराचे पोषण करून शकतो.
सर्व पोषकतत्त्वे उत्तम पद्धतीने हव्या त्या पद्धतीने मिळत राहिल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहीलच, पण त्यासोबत मेंदूचीसुद्धा कार्यक्षमता वाढण्यास खूप हातभार लागेल. पण आज अनेक स्त्रियांना बहुतेकवेळा पोषण तत्वांच्या अभावामुळे हायपर किंवा हायपो थायरॉईडचा त्रास असतो. हाडांची ठिसूळता, स्नायूंचे आकुंचन प्रसरण होण्याची क्षमता, मानसिक अस्वास्थ्य, इत्यादी त्रास आजकाल सर्वसामान्य आहेत.

आपल्याला असलेल्या शारीरिक आजारांसाठी काय पोषण असावे हे तज्ज्ञ लोक सांगू शकतात पण तरीही वर सांगितल्याप्रमाणे सर्व अन्न घटकांचा आलटून पालटून समावेश असणे व संतुलित आहार हेच त्याचे उत्तर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळिशीत सुरू झालेल्या त्रासाचे कारण हे खरेतर – लहानपानापासून किंवा काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कुपोषणाचा किंवा अयोग्य आहाराचा परिणाम असतो. कारण पूर्वीपेक्षा आरोग्याच्या तक्रारीमध्ये हल्लीच्या काळात खूपच वाढ झाली आहे.
ही सगळी परिस्थिती बघता, नियमित संतुलित आहार, व्यायाम, भरपूर पाणी, चाळिशीनंतर काही आरोग्य विषयक चाचण्या करणे आवश्याक झालेले आहे. मनाच्या पोषणासाठी उत्तम विचार असलेल्या लोकांशी मैत्री, उत्तम पुस्तके, ध्यान, प्राणायाम, उत्तम विचारांचे आदान प्रदान, छंद जोपासणे, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव येणाऱ्या गोष्टींपासून लांब राहणे, आवश्याक आहे. ह्या सर्वांसाठी सकारात्मक प्रयत्न हवेत. हेच मनाचे पोषण होय. आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानास्किकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची खूपच गरज आहे. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ मिळतात ना, हे बघणे खूप गरजेचे आहे. आपल्याला सर्वसाधारण पोषण म्हटले की शरीराचे असे चटकन डोक्यात येते, पण फक्त शरीराचे पोषण पुरेसे नाही हेसुद्धा लक्षात घायला हवे. मनाचे पोषण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपण टीव्हीवर अनेक अन्नपदार्थांचे पोषण मूल्य वाढवणारी नवीन नवीन उत्पादने पाहतो आणि घेतोही. पण मनाचे पोषण होण्याची गरज फारच कमी लोकांमध्ये आढळून येते आणि बरेच लोक ह्यासाठी अजूनही तयार नाहीत. खरेतर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते.


Regards


 


(Image From) http://therebelworkout.com  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या