गरज मानसोपचाराची

गरज मानसोपचाराची


जगात एक अशी गोष्ट आहे की जी वेगळी होऊ शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे आपले शरीर व मन , ते कधीच एकमेकांपासून वेगळे करता येत नाही, माणूस म्हणजेच शरीर, बुद्धी व मन याचा त्रिवेणी संगम आहे. एखादी जखम झाली तर आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो; परंतु मन आजारी पडले तर कित्येकदा आपल्याला कळतही नाही. मन आजारी पडणे म्हणजेच मानसिक आजार होय हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे.

सर्वप्रथम आपण मानसिक आजार म्हणजे काय व तो कुणाला होऊ शकतो? हे समजून घेतले पाहिजे जसे की हल्ली दररोज आपण टी. व्ही. वर किंवा वृत्तपत्रात भडक बातम्या वाचतो व पाहतो. उदा. खून, मारामाऱ्या, विध्वंसक वृत्ती, आत्महत्या, चोऱ्या, बलात्कार, अंधश्रद्धा वगैरे, ह्या सर्व विकृती झपाट्याने जगभर वाढू लागल्या आहेत आणि ह्याचा थेट परिणाम मानवी मेंदूवर नकळत होऊ लागला आहे त्यामुळेच भारतात व इतरही देशांत मानसोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा व यामुळे उद्‌भवणाऱ्या मानसिक समस्या व विकृती, उदासीनता, टेन्शन, भीती, असुरक्षितता, न्यूनगंड ह्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. ह्या अशा गोष्टींमुळे बदलणारे जीवनमान व त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक ताणतणाव, वाढत्या अपेक्षा, नोकरी- धंद्यातील अपयश, असाध्य गोष्टी मिळवण्याचा अट्टहास, शैक्षणिक, वैवाहिक किंवा प्रेमात येणाऱ्या अपयशातून निर्माण होणारे नैराश्य अशा असंख्य गोष्टी मानसिक असंतुलनास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच जर आपल्या वागण्यात जर विक्षिप्तपणा वाढत असेल तर ताबडतोब मानसोपचारांचा सल्ला घेतल्यास पुढील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. तसेच सर्वप्रथम वेडेच लोक मानसोपचारांचा सल्ला घ्यायला जातात हे मनातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजे कारण आताच म्हंटल्याप्रमाणे जागतिक बदलाला जर तुम्हाला सामोरे जायचे असेल तर तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम असलेच पाहिजे कारण मानसिक आजाराची लक्षणे ही कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकतात.

हल्लीच्या लहान मुलांमध्ये जर तुम्ही पहिले तर हट्टीपणा, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, उदासीनता, विध्वंसक वृत्ती, शैक्षणिक तक्रारी, भीती, असंबद्ध बडबड, विक्षिप्तपणा ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तसेच अल्पवयीन मुलांमध्येही वरील लक्षणे तसेच हार्मोन्सच्या बदलामुळे व्यक्तिपमत्त्वाच्या समस्या, न्यूनगंड, शैक्षणिक स्पर्धेच्या युगात वाढत्या अपेक्षा व टेन्शन, भीती व आत्महत्येचा प्रयत्न, तसेच हल्ली टी. व्ही. मालिका, सिनेमा, जाहिरातींचा मुलांच्या मनावर व व्यक्ति्मत्त्वावर फार मोठा प्रभाव कळत नकळत पडत आहे. त्यातूनच मुक्त् जीवन पद्धतीचे अनुकरण, भौतिक सुखसुविधांचे आकर्षण, ते मिळविण्यासाठी काहीही करण्याची तयारी, त्यातील अपयशामुळे नैराश्य, उदासीनता, आत्मघातकीपणा व आत्महत्येचा अविचार, व्यसनाधीनता,पराकोटीची ईर्षा व हिंसात्मक प्रवृत्ती बळावते आहे. स्त्रियांच्या मानसिक समस्या, कौटुंबिक व वैवाहिक जीवनातील समस्या, तसेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्वभावातील चिडचिडेपणा, असुरक्षिततेची भावना, औदासीन्य ह्या आणि अशा बऱ्याच मानसिक आजाराशी निगडित गोष्टी हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत.


नोकरी करणाऱ्यांच्या, बिझिनेसमेन किंवा एक्झि क्युटिव्ह वर्ग यांच्यावर स्पर्धेच्या युगात कामाच्या दडपणामुळे (स्ट्रेस) निर्माण होणारे टेन्शन, वाढणारा रक्त दाब, तसेच इतर समस्यांसाठी कौन्सिलिंगचा लाभ हल्ली मोठ्या शहरातील बरीच मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन घेऊ लागली आहेत आणि ते त्यांच्या प्रोफेशनल लाइफ मध्ये टिकून राहण्यासाठीही त्यांना उपयुक्त ठरत आहे. जर मानसिक ताणामध्ये वेळीच उपचार न घेतल्यास वाढत्या रक्तदाबामुळे हृदयावर परिणाम होऊन हल्ली हार्टऍटॅकचे प्रमाण 30 ते 40 या वयोगटात मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. तसेच आज बऱ्याच लोकांना स्ट्रेस, डायबिटीस (मधुमेह), दमा, यासारख्या समस्याही लहान वयात होताना दिसून येत आहेत. त्यामुळे कित्येक मंडळींत अनामिक भीती, असुरक्षितता व त्यातून त्यांच्या रोजच्या दैनंदिन कामावर होणारे दुष्परिणाम दिसून येत आहेत. पोलीस डिपार्टमेंटमधील लोकांमध्ये ह्याचे प्रमाण खूपच मोठे आहे कारण कामाचे टेन्शन व कामाचे स्वरूप, न मिळणाऱ्या सुट्ट्या, त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक ताणतणाव व व्यसनाधीनता, निद्रानाश यामुळे ही मंडळी सुद्धा कायम एका ताणतणावाखाली काम करत असतात.

मानसिक आजारामुळे त्या व्यक्तीचा बऱ्याचदा कामाचा वेगही मंदावतो, शारीरिक व्याधींनाही तो हळू हळू बळी पडू लागतो. जर अशा परिस्थितीत योग्य वेळेस जर कौन्सिलिंग केले तर त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो व ही व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत तसेच त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाबरोबर सहजतेने वागू शकते.


तसेच अनेकदा व्यक्तिमत्त्वाच्या समस्याही बऱ्याच प्रमाणात आढळतात, त्यासाठी कौन्सेलिंगचा भरपूर फायदा होतो. त्यामुळे हल्ली मोठ्या शहरात मानसोपचार तज्ज्ञाला वेड्यांचा डॉक्टर म्हणण्याची प्रथा आता कमी होत असलेली आढळून येते. किंबहुना वेडे व्हायचे नसेल तर लवकरच मानसोपचार तज्ज्ञांकडे जावे, ही काळाची गरज आहे, हे आजच्या सुशिक्षित व्यक्तींना पटलेले आहे. हे तर झाले मोठ्या शहरांच्या बाबतीत पण आजही लहान गावात व अशिक्षित वर्गात मानसिक आजारांबद्दल माहिती नसल्यामुळे अजूनही खेडेगावात मानसिक आजार विकोपास गेल्यानंतरच रुग्ण मानसोपचार तज्ज्ञांकडे जातात किंवा असे रुग्ण कित्येकदा स्वत: आत्महत्या तरी करतात किंवा खून करतात. त्यासाठीच   समाजात मोठ्या प्रमाणात मानसिक आजारांबद्दल जागृती निर्माण करणे हे गरजेचे आहे.Regards


 

(Image From) https://www.assignmenthelphub.com

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या