बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-१)

बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-१)


आजच्या बदलत्या युगामध्ये मोठ्या व्यक्तींना निरनिराळ्या हेल्थ समस्यांना तर सामोरे जावे लागतच आहे पण हल्ली ह्याचबरोबर ह्या आजच्या बदलत्या युगात बालकांच्या आहाराबाबत सुद्धा त्यांचे पालक हे गोंधळलेले आहेत हे मान्य करायला हवे. आपल्या मुलांना स्वतःच्या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून कोणत्या वयापासून काय आहार द्यायला हवा, लिक्वीड डाएटवरून सॉलिड डाएटवर कधी जावे किंवा अगदी सूप्स आणि फ्रुट्‌स कधी द्यावीत, हेच समजेनासे होते. कारण याच गोष्टीवर आपल्या मुलांच्या शरीराची ठेवण आणि आरोग्य अवलंबून असते. लहान वयातच आहार नीट मिळाला तर मुलांची वाढही योग्य होईल हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याविषयीच आज मी तुम्हाला येथे काही सांगणार आहे..…
मुलांचे पालक हे त्यांच्या आरोग्यदायी जीवनाचा पाया उभारण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात आणि बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि वर्तणुकविषयक विकासामध्ये समतोल आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही गोष्ट मुलांच्या पालकांनी नीट समजून घेतली पाहिजे. आजच्या घडीला आहाराच्या बाबतीत आपण दोन टोकांवर उभे आहोत – कुपोषण आणि अतिपोषण! लहान मुलांच्या आहारात मुख्य करून फास्ट फूड आणि प्रोसेस फूडचा अधिक वापर हल्ली होताना दिसून येतोय त्यामुळे प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजद्रव्यांकडे दुर्लक्ष होतेय.  आहारातील या असमतोलामुळे मुलांच्या आरोग्यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होत आहेत. त्यामुळे हल्लीच्या मुलांमध्ये स्थूलता, लहरी स्वभाव आणि चंचलता, अशा गोष्टी सातत्याने होताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शारिरीक अथवा मानसिक दुर्बलताही दिसून येत आहे.
योग्य वाढीसाठी उत्तम आहार महत्वाचा!
हल्लीच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण मुलांना देत असलेल्या आहारातले प्रत्येक पोषकद्रव्य बालकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्वाचे असते कारण लहान वयात बालकांच्या शरीरामध्ये पोषकद्रव्यांचे शोषण अतिशय प्रभावीपणे आणि वेगाने होते. त्यामुळे त्यांच्या दररोजच्या आहारात प्रत्येक पोषकद्रव्य योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. जनरल सायन्स आपल्या सर्वांनाच माहित आहे की बालकांची उंची, वजन, स्नायूंची ताकद, हाडांची व दातांची मजबूती, डोळ्यांची क्षमता पहिल्या १८ वर्षांपर्यंत झपाट्याने वाढत असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना लहान पणापासूनच उत्तम दर्जाची प्रथिने, आवश्यचक मेदाम्ले, लोह-कॅल्शियम-मॅग्नेशियमसारखी खनिजद्रव्ये, पाण्यात व मेदात विरघळणारी जीवनसत्वे त्यांच्या रोजच्या आहारात अवश्य् समावेश करायला हवीत.
तुमच्या पाल्याचे दात किडलेत का? किंवा लहान वयातच हाडे दुखतायत का???

वेफर्स, बेकरीतले पदार्थ, शीतपेये, पॅकबंद ज्यूसेस, आणि रेडी-टू-सर्व्ह पदार्थ असे साखर आणि फॅट्‌स जास्त असणारे पदार्थ सर्वप्रथम जर पालकच खात असतील तर त्यांनी आधी ते स्वतः बंद करावेत कारण लहान मुले ही सर्व प्रथम आपल्या आई वडिलांना फॉलो करतात म्हणून जर पालकांनी रोज पोषक आहार घेतला तर मुलेही तोच आहार घेतील कारण फास्ट फूड हे कालांतराने अनेक आजारांना आमंत्रणच ठरतात आणि ह्याचाच दीर्घकालीन परिणाम म्हणजे मधुमेह, उच्चरक्त/दाब, कर्करोग यांसारख्या आजारांशी गाठ पाडण्यात होऊ शकतो.

Regards

 (Image From) https://www.hsph.harvard.edu


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Post a Comment

0 Comments