ह्या सवयींमुळे आजारपण जाईल पळून!

ह्या सवयींमुळे आजारपण जाईल पळून!

आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्याला कित्येक प्रकारचे आजार असलेले नजरेस येतात आणि ह्यातील बहुतेकांच्या आजाराचे मुख्य कारण हे त्यांची आत्ताची जीवनशैली असून धकाधकीच्या आणि गुंतागुतीच्या जीवनशैलीचा परिणाम अशांच्या आरोग्यावर झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर प्रदूषण, अपूरी झोप, अवेळी खाणे, ताण या सगळ्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते आणि ह्यातील प्रदूषण आपण रोखू शकत नाही पण इतर गोष्टी नक्कीच व्यवस्थितपणे आत्मसात करू शकतो आणि काही चांगल्या सवयींनी आपण सध्याच्या लाईफस्टाईल डिसीजवर नक्कीच मात करू शकतो. तर आता आपण जाणून घेऊया या सवयींविषयी...

सकारात्मक विचार करावा

हे जरा वर वर पाहिले तर काहींना जरा पचणे जड जाईल पण सुखी आणि यशस्वी आयुष्याचा मुख्य कानमंत्र हाच आहे तसेच जर आपण पाहिले तर जीवनात आपण नेहमीच आनंदी राहू शकत नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपण दुःखी असतो, त्रासलेले असतो. अशा वेळेस मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि ह्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच येतात मात्र अशा परिस्थितीत नकारात्मक विचार करणे योग्य नाही. कारण आपल्या मनाची शक्ती अपरंपार आहे.

म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. तशी सवयच लावून घ्या. त्यामुळे तुमचा ताण-तणावही कमी होईल. स्वतःच्या बाबतीत जर काही नकारात्मक घडले असेल तर नीट शांतपणे त्याचा विचार करा आणि ही गोष्ट माझ्याबरोबर का घडली ह्याचे मूळ कारण शोधा तुम्हाला भविष्यात अशा प्रसंगात ते नक्कीच उपयोगी पडेल.

भरपूर पाणी प्या

चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले आणि कुठेही सहज उपलब्ध असलेले पेय म्हणजे पाणी, आपल्या शरीराचा ७२% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे म्हणूनच रोज कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तज्ञ लोकांच्या रिपोर्टनुसार, शरीराच्या वजनाच्या २० किलोमागे एक लीटर पाणी प्यायला हवे. म्हणजेच जर तुमचे वजन ६० किेलो असेल तर दिवसभरात रोज ३ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे आणि जर ३ लिटर शक्य नसेल तर आयडिअली २ लिटर पाणी प्यायलाच हवे.


गरम पाणी प्या

ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या सर्दी किंवा खोकला झाल्यावर गरम पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र त्याव्यतिरिक्तही नेहमी किंवा सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्यास खूप फायदा होईल कारण गरम पाण्याने आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ ( टॉक्सिन्स ) शरीराबाहेर काढून टाकण्यास खूपच मदत होते.

व्हिटॉमिन सी चे सेवन

मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास व्हिटॉमिन सी फायदेशीर ठरते म्हणूनच आपल्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा नेहमी समावेश करावा.

 

Regards

 (Image From) https://www.healthykids.nsw.gov.au


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या