नाईट शिफ्ट करताय? मग सावधान...

नाईट शिफ्ट करताय? मग सावधान...


सध्या सगळीकडेच ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ (आठवड्याचे सर्वच दिवस) काम करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळंच इथले काम करणारेही 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात तर काहींना तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय.. तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.

पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे अशा नाईट शिफ्ट तुमच्या शरीरासाठी भविष्यात धोकादायक आहेत !!!! ह्याची जाणीव कदाचित ते काम करण्यालाही कदाचित नसेल आणि इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सतत नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो.

 

'नाईट शिफ्ट'चे दुष्परिणाम...

१. अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्याची शरीराची ताकद कालांतराने क्षीण होऊ लागते, झोप पूर्ण होत नाही आणि कायम थकल्यासारखे वाटते.

२. याचा मानसिक परिणामही होऊन अशा लोकांना एखादी गोष्ट समजण्यासाठी कालांतराने वेळ लागतो आणि त्यांच्यातली भावना हळूहळू कमी होत जाते. अशा नाईट शिफ्ट करणाऱ्यांचा रक्तदाब अचानक वाढायला लागतो.

३. निसर्गाच्या नियमानुसार रात्रीची ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे पण नाईट शिफ्ट करणारे दिवसा झोपतात त्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दबाव वाढतो तसेच अशांना मधुमेह होण्याचा धोकाही अधिक असतो.

४. नाईट शिफ्ट करणाऱ्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे डायबेटिजचा धोका वाढतो.

नाईट शिफ्ट करणं हे गरजेचं आहे की अपरिहार्य गोष्ट... हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी येथे तुम्हाला असे जरूर सांगेन की जर सतत नाइट शिफ्ट करून जर तुम्हाला काही शारीरिक आणि मानसिक समस्यांची जराही चाहूल लागली तर वेळीच तुम्ही एक्सपर्ट व्यक्तीचा सल्ला घ्या.


Regards 


https://lifehacker.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या