ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!

ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!

जर तुम्हाला ऑफिसमध्ये रोज पोहोचण्यासाठी रोजच सकाळ संध्याकाळ मिळून २ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते भविष्यात तुमच्या आरोग्याला ते धोकादायक ठरू शकतं. कारण हल्लीच्या जीवनशैलीबद्दलच्या एका अभ्यासाअंती संशोधकांनी याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या संशोधकांच्या मते जे लोक अधिकाधिक त्यांचा वेळ बस, ट्रेन आणि कारमध्ये घालवतात त्यांच्यासाठी ही स्वतःची वेळीच काळजी घेण्याची वेळ आहे कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रवासात अधिक वेळ गेल्यास आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते.

ह्याच संशोधनामध्ये असे आढळून आले आहे कि जे लोक लांबचा प्रवास करतात ते साधारण आपल्याबरोबर 800 कॅलरीचे पदार्थ सोबत ठेवतात आणि त्यातील काही लोक ते प्रवासादरम्यान खातात. जर तुम्हीही रोज लांबचा प्रवास करत असाल, तर ही गोष्ट तुमच्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे.


लांबच्या प्रवासामुळे आणि ट्रॅफिकमुळे तणाव वाढतो तसेच जर ट्रेनचा प्रवास असेल आणि गाड्या वेळेवर नसतील तरीही तणाव वाढतो तसेच ऑफिसचे ८ ते १० तास बसून काम आणि प्रवासातही बसून जाणे असेल तर फिजिकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. अशावेळी बीएमआय आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होते. एवढच नव्हे, तर अधिक वेळ प्रवासात गेल्यास, आरोग्यास हितकारक जेवण करणंही आपसूक कमी होतं. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम कालांतराने आरोग्यावर होतो आणि झोपही पूर्ण होत नाही.

म्हणून संशोधकांनी देखील हे आवर्जून नमूद केले आहे की आपण कशाला प्राथमिकता दिली पाहिजे, आपल्या आरोग्याला की ट्रॅव्हल कल्चरला, हे ठरवलं पाहिजे.

येथे मी ट्रॅव्हल कल्चर अशासाठी म्हंटले आहे की जर आपण रोज २ तास ऑफिससाठी प्रवास करत असाल तर आठवड्याचे साधारण १० ते १२ तास होतात आणि सध्या शहरी लोकांचे शनिवार आणि रविवारी किंवा त्यालाच जर सुट्टी जोडून आली तर हिल स्टेशनवर स्वतःचे वाहन घेऊन जायचे कल्चर खूपच वाढले आहे आणि तेही तासंतास ट्रॅफिक मध्ये अडकून त्या त्रासदायक प्रवासातून हे लोक त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतात म्हणजे पुन्हा स्ट्रेस!!! आणि हीच स्थिती परतीच्या प्रवासात रिपीट होते, कारण नेक्स्ट डे ला पुन्हा कामावर रुजू व्हायचे असते. परत २ तासाचा ट्रॅफिकने भरलेला प्रवास ऑफिससाठी करायचा असतो !!!! म्हणूनच आपण हे ठरवले पाहिजे की कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे ते.संशोधकांच्या या अभ्यासात असेही आढळले आहे की, 45 टक्के लोक प्रवासादरम्यान नेहमी तणावात असतात. कारण ते आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत आणि कामावर किंवा घरी पोचण्याचे टेन्शन तर असतेच. त्याचवेळी 41 टक्के लोकांचं म्हणणं आहे की ते फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी करतात कारण प्रवासातच ते मानसिकरित्या थकून गेलेले असतात. तर काही लोकांची झोप पूर्ण होत नाही, तर काहीजण प्रवासादरम्यान जंकफूड खूप खातात.


Regards

 


(Image From) https://www.trukky.com  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या