शनिवार, १३ जानेवारी, २०१८

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा...

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा...सर्वसाधारणपणे जेवण झाल्यानंतर अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय असते किंवा लगेच झोपण्याची सवय असते. पण एका संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की तुमच्या आरोग्यासाठी नेमक्या याच गोष्टी हानीकारक आहेत. कारण संशोधकांच्या मते या गोष्टी केल्याने त्याचा थेट तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने तुमची फक्त पचन क्रियाच बाधीत होत नाही तर यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो आणि तसेही सिगरेट ओढणे ही सवयच मुळात वाईट आहे तसेच जेवणानंतर तुम्ही लगेच अंथरुणावर पडलात किंवा लगेच झोपी गेलात तर तुमची पचनक्रिया थांबते. अन्न पचायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो, जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस आतड्यांच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच जेवण झाल्यानंतर साधारण ३० मिनिटांनी चालायला गेल्यास   त्याचा अन्न पचनासाठी नक्कीच फायदा होतो आणि वजनही आटोक्यात राहते

बरेच जण जेवणानंतर फळे खातात पण ते पचनासाठी फारसं फायदेशीर नसते, जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळे नेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवीत तसेच सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणे सर्वाधिक फायदेशीर असते. जेवणानंतर लगेच अंघोळ करणं देखील आरोग्यास चांगले नसून अंघोळ करताना हात - पाय सक्रिय झाल्याने या भागातील रक्तप्रवाह वाढतो तसेच पोटातलाही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.
जेवणानंतर अनेकांना भरपूर पाणी पिण्याची सवय असते परंतु तेही शक्यतो टाळावं, जेवणानंतर साधारण ३० ते ३५  मिनिटांनी पाणी प्यायलेलं कधीही चांगलं असतं. कारण जेवताना किंवा लगेच जेवणा नंतर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया प्रभावित होते.

जेवणानंतर काही लोकांना चहा पिण्याची पण सवय असते. पण तसं करणं देखील तुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे पचनावर वाईट परिणाम होऊन पचनक्रिया प्रभावित होते. म्हणून जेवणानंतर चहा हवाच असेल तर तो किमान दोन तासांनी प्यायला हवा. जेणेकरून तुमच्या पचनक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.


Regards

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा

 


(Image From) https://truweight.in

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:  
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...