राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा


आज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात लहान मोठ्या प्रमाणात ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागतो तेंव्हा काही अडचणी येतात आणि जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर कमी अधिक प्रमाणात रागही येतो आणि माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण हा राग जर तीव्र असेल तर काही विपरीतही घडू शकते, भांडणे मारामाऱ्या होऊ शकतात एकूणच काय तर वातावरण बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो.
अशा परिस्थितीतला तोंड द्यायचे तर काय करायचं? तज्ज्ञांच्या मते, कुठलीही व्यक्ती जेव्हा रागावते तेव्हा तिच्या शरीरात एक एनर्जी तयार होते आणि जर ती दाबून ठेवली, तर हृदयावर परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळी काय करावं? तज्ज्ञ नेहमी सांगतात, की तुम्ही अनेक सिनेमे आठवा त्यात राग आला तर हिरो पंचिंग बॅगवर आपला राग काढतो. तुम्हीही तसंच करू शकता ते पण तुमच्या घरातील उशीवर आणि जर बाहेर कुठे असाल तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, दीर्घ श्वास घ्या आणि तोंडावाटे सोडा किंवा १०० ते १ असे उलटे आकडे मोजा. त्यामुळे तुमच्या रागाला वाट मिळेल. आणि वातावरणही कलुषित होणार नाही.

राग आला तर वर मी म्हटल्याप्रमाणे तो व्यक्त होण्याआधी दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वसनानं राग शांत होण्यास मदत होते. अनेकदा लोक रागाची घटना घडून गेल्यावर तेच तेच उगाळत बसतात आणि कित्येक दिवस ते मनात ठेवून घेतात तर तसं अजिबात करू नये बऱ्याचदा घटना या प्रासंगिक असतात. संवादानं बऱ्याच समस्या कमी होतात.याशिवाय रोज अर्धा तास मेडिटेशन केलं तर मन शांत राहतं. आलेला राग चटकन नाहीसा होतो. रोज रात्री झोपण्या अगोदर टीव्ही अथवा मोबाईल मध्ये वेळ घालवण्यापेक्षा शांत बसून स्वसंवाद करा.

Regards

 (Image From) https://www.pinterest.com

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com


Post a Comment

0 Comments