व्यायाम न करता कशी कमी कराल पोटावरची चरबी?

व्यायाम न करता कशी कमी कराल पोटावरची चरबी?


आज बरेच जण हे स्वत:ला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसून येत आहेत, पण वाढलेलं पोट कमी करण्याचा जास्तीत जास्त लोकांचा प्रयन्त असतो पण आपण दररोजच्या कामामुळे व्यस्त असतो. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही आणि खाण्यावरही फार नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे पोटाचा घेरही वाढत जातो आणि सिच्युवेशन अवघड होऊन बसते अशांसाठी मग पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स-
1) बसण्याच्या पद्धती
मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे आपली बसण्याची अयोग्य पद्धत आपल्या पोटाची चरबी वाढण्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं पण हे ऐकून आश्चर्यचकित होऊ नका कारण हे खरं आहे आणि ज्या व्यक्ती खासकरून जास्त वेळ कंम्प्युटरच्या समोर बसतात, त्यांच्या पद्धतीमुळे पोटातील स्नायू बाहेर येण्यास सुरुवात होते आणि त्याने पोट बाहेर यायला सुरुवात होते म्हणून जास्तीत जास्त वेळ सरळ बसण्याचा प्रयत्न करा, पण त्याने जर तुमच्या पाठीला त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठीमागे उशी ठेवून बसा तसेच अधून मधून स्ट्रेचिंग करण्याची सवयच स्वतःला लावून घ्या.
2) खाण्याची वेळ
चांगल्या आरोग्यासाठी खाण्याची वेळ ही काही केल्या पाळलीच पाहिजे आणि खासकरून सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधील वेळ हा खूपच महत्त्वाचा आहे. सकाळी  उठल्यानंतर साधारण 2 तासानंतर अगदी पोट भरून नाश्ता करा मग त्यानंतर 4 किंवा 5 तासानंतर जेवण करा. जेवण घरचे तसेच पोषक, फायबरयुक्त आणि जरा हलके करा जेणेकरून दुपारी झोप आणि आळस कमी येईल.
3) साखरेचे प्रमाण कमी करा
पूर्वीच्या काळी सणावारीच गोड पदार्थ खाल्ले जायचे त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण योग्य राहायचे पण हल्ली अगदी छोट्या छोट्या ओकेजनला लोक गोड पदार्थ तसेच पेस्ट्रीज खाताना मोठ्या संख्येने आढळून येत आहेत म्हणूनच साखरेचा वापर कमी करा, साखरेऐवजी गूळ, मध किंवा खजूर याचा वापर खाण्यात करा. कुठल्याही ओकेजनला आपण गोड पदार्थ नाकारू शकत नाही पण कमी नक्कीच खाऊ शकतो. थोडक्यात काय तर गोड पदार्थ खाण्यावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे.
4) डाएटमध्ये फायबर पदार्थ खा
आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने खाल्लेलं पचायला मदत होते तसेच पोटाचे आजार टळतात आणि वाढत्या चरबीवर नियंत्रण राहते. विटॅमिन सी असलेली फळं आणि भाज्या खाल्ल्याने शरीरातील लोहयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत होते.

Regards

 


(Image From) https://weheartit.com

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या