अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती


सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात  जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहे.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स मी येथे देत आहे...
१) रिलेशन हे कुठलेही असो ते म्हणजे एक प्रकारची गुंतवकणूक असते त्यात आपल्या प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांना अवघड काळात मदत करण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी ही मोलाची नाती खूप महत्वाची आहेत.
२) आपल्या कुठल्याही नात्यामध्ये तुम्ही जितकं तुम्ही समोरच्याला द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही जितकं प्रेम आणि विश्वास दाखवाल तितकांच तो तुम्हालाही मिळेल. तसेच हे करण्यासाठी एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचे आहे
३) मतभेत हे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक नात्यामध्ये असतात म्हणून वाद घालत बसणं काहीच फायद्याचं नाही. आणि अशा परिस्थितीत समोरचा बदलणार नसेल तर त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला बदला. हे जरा तुम्हाला पचवणं जड जाईल पण ह्यानेच तुम्ही सुखी व्हाल म्हणून एखाद्याकडून अपेक्षा करणं कमी करा.
४) सध्याच्या फास्ट लाइफमध्ये जवळ जवळ सगळीच नाती ही पैशावर चालत आहेत त्यामुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावून बसतो, म्हणून नात्यांमध्ये कधीही पैश्याचं मोजमाप येऊ देऊ नका.
५) बरेचदा नातं हे रक्ताचं आहे असं म्हणतात पण खरं नात म्हणजे जे मनातून जूळतं, एक रेशीम धागा जो अती ताणला तर तुटून जातो. म्हणून नात्याला खूप हळूवार आणि प्रेमाने जपा.
६) कोणी येईल आणि मला खुश ठेवेल या विचारात कधीच राहू नका आणि मी खुश नाही याचं खापर नात्यावरही फोडू नका कारण आपल्यावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला आपणच सर्वस्वी जबाबदार  आहोत हे सत्य स्वीकारायला शिका.
७) तुमचे रिलेशन कुठलेही असो ते नेहमीच विश्वासाच्या जोरावर सिद्ध करा ज्यमुळे  समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल फक्त प्रेमचं नाही तर अभिमानही जागा होईल.
८)  एखाद्याची गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर जरा शांतपणे विचार करा, आणि कळतं नकळंत तुम्हीही तसचं इतरांबरोबर वागत नाही ना हे तपासून पहा.
ह्या वर दिलेल्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही नीट शांत मनाने विचार केला आणि तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल केलात तर तुम्ही कुठलेही रिलेशन घट्टपणे जोडू शकता आणि टिकवूही शकता.

Regards


 

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या