नारळपाणी पिण्याचे आहेत भरपूर फायदे

नारळपाणी पिण्याचे आहेत भरपूर फायदे


काही वर्षांपूर्वी नारळपाणी आपल्याला शक्यतो  समुद्रकिनारीच आढळून यायचे पण आता तसं नाहीये कारण आज नाक्यानाक्यावर आपल्याला नारळ पाणीवाला नजरेज पडतो,तर आज आपण जाणून घेऊया ह्या नारळ पाण्याचे महत्वाचे फायदे. नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात तसेच नारळ पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळून आपोआपच शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.तसेच ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल तर अशा लोकांनी नारळपाणी प्यायला सुरवात करावी जेणेकरून त्यांचे वजन नियंत्रणात येईल. पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे तज्ञांच्या मते सकाळच्या वेळेस नारळपाणी पिणे हे सर्वाधिक फायद्याचे असते. जर तुम्ही सकाळी नारळपाणी पिता तर दिवसभर तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.

नारळपाणी पिण्याचे फायदे

१. थायरॉईड हार्मोन्सना संतुलित ठेवण्याचे उत्तम  काम नारळपाण्यामुळे होते म्हणून जर सकाळच्या वेळेस नारळपाणी प्यायले तर थायरॉईड हार्मोन्स नियंत्रित राहण्यास खूपच मदत होते. 

२. ज्यांना किडनीचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल अशांनी नारळपाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. यामुळे युरिनरी ट्रॅक साफ राहून किडनी स्टोनपासून बचाव होतो.

३. हल्ली जरा वातावरणात बदल झाला की सर्दी आणि खोकला होण्याचे प्रमाण जास्त नजरेस पडते म्हणूनच नारळपाण्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून अशा बारीकसारीक अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो.

४. हल्ली वजन वाढीच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत जर  तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करताय तर नारळपाणी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. नारळपाणी प्यायल्याने खूप वेळ भूक लागत नाही.

५. नारळपाणी प्यायल्याने त्वचा कोरडी न पडत तिच्यात ओलावा कायम राहतो.

 

Regards 


http://www.tiana-coconut.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या