तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!


आजकाल आपण पाहतो सर्वच मोठ्या शहरांमध्ये ट्राफिक खूपच वाढले आहे ह्याचा सरळ अर्थ असा होतो की बरेच लोक आज सार्वजनिक वाहनांपेक्षा स्वतःचे वाहन घेऊन जातात आणि जर तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला ही सवय बदलण्याची नितांत गरज आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा आयक्यू (बौद्धिक क्षमता) कमी होतो.
जे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात, ते मानसिकरित्या खूप थकतात आणि सुस्तही राहू लागतात. ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या क्षमतेवर होतो आणि परिणामी आयक्यू लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
ह्याचा रीतसर अभ्यास करण्यासाठी 35 ते 75 या वयोगटातील १ लाखांपेक्षा जास्त व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं आणि ह्याच संशोधनादरम्यान सलग 5 वर्षांसाठी या व्यक्तींच्या जीवनशैलीवर बारीक लक्ष ठेवून त्यांची बुद्धीमत्ता आणि स्मृतीही तपासण्यात आली.

ह्याच संशोधनात असे आढळून आले की ज्या व्यक्ती दररोज 2 ते 3 तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करतात, त्यांच्या मेंदूची क्षमता अगोदर कमी होत गेली आणि नंतर मात्र आयक्यूही कमी होण्यास सुरुवात झाली.

हे तर झाले ड्राइविंगबद्दल पण सध्याची पिढी ही टीव्ही, सोशिअल मीडिया तसेच मोबाइल वर चॅटिंग करण्यात घालवत आहे अशा व्यक्तींवरपण संशोधन करण्यात आले आणि जे लोक ३ तासांपेक्षा जास्त वेळ वर दिलेल्या गोष्टींमध्ये घालवतात त्यांचीही बौद्धिक क्षमता कालांतराने कमी झाली असल्याचं समोर आढळून आलं.  
Regards

 


(Image From) https://www.123rf.com

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या