बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...

८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...


आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि ह्या समस्यांचे मूळ कारण जर शोधले तर ते आपल्या झोपेच्या वेळेमध्ये आहे. जर एखादी व्यक्ती ८ तासांची झोप घेत नसेल तर ती त्याच्यासाठी धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार हे आता सिद्ध झाले आहे की आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये नियमितपणे झोप नीट न झाल्यास नकारात्मक विचारांचे प्रमाणही वाढते.
यामुळे अशा व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो. म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप ही घेतलीच पाहिजे.

मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

सतत सेल्फी काढणे हा मानसिक आजार?

सतत सेल्फी काढणे हा मानसिक आजार?

तुम्हाला ऐकून जरा आश्चर्यच वाटेल पण हे खरे आहे कि सतत सेल्फी काढणे हा आता एक नवीन आजार आजच्या लोकांमध्ये आढळून यायला लागला आहे. आजकाल आपण पाहतो की तरूणाईला सेल्फीची भलतीच क्रेझ आहे. त्यामुळे अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. मात्र सेल्फीचे वेड अजून एका प्रकारे धोकादायक ठरेल.

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा अवघडच बनून राहिले आहे. पण ह्याच व्यस्त जीवनशैलीतून जर आपण आपल्या खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. परंतु त्यासाठी अशा ओव्हरवेट लोकांनी जाणीवपूवक प्रयत्न केले पाहिजेत आणि काही खास टीप्सही लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेकदा आपल्याकडून आपल्याला आवडणारा  पदार्थ अधिक खाल्ला जातो आणि असा पदार्थ वारंवार कालांतराने खाल्ला गेल्यास वजनाचं गणित बिघडते. म्हणून कटाक्षाने या टीप्स लक्षात ठेवा.

रविवार, २८ जानेवारी, २०१८

ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही हेल्दी उपाय...

ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही हेल्दी उपाय...


सध्याच्या कॉर्पोरेट कल्चर मध्ये कामाचा ताण आणि ऑफिसचे जास्त कामाचे तास ह्यामुळे मेंदूवर खूपच ताण येतो आणि अशातच ऑफिसमध्ये दुपारी लंच ब्रेक नंतर आळसवाणे वाटणे हे तर बऱ्याच लोकांमध्ये कॉमन होऊ लागले आहे. त्यातच जर ऑफिसमध्ये दुपारी एखादी महत्त्वाची मिटिंग किंवा काम असेल तर अत्यंत त्रासदायक ठरते. अशावेळी बरेच जण झोप घालवण्यासाठी आणि चटकन फ्रेश होण्यासाठी कॉफी किंवा चहा घेणे पसंत करतात. परंतु, या व्यतिरिक्तसुद्धा काही हेल्दी आणि परिणामकारक पर्याय आहेत.

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश हवाच

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश हवाच


सध्याच्या फास्ट लाइफ मध्ये बरेच जण हे पटकन आणि लागेश तयार पदार्थ खानाकडे हल्लीच्या पिढीचा जास्त काळ दिसून येत आहे पण ह्या अशा पदार्थांमध्ये फायबरची कमतरता असते आपल्या आहारात भाज्या, पालेभाज्या, फळं, धान्यं आणि कडधान्यं यांचे प्रमाण आपण वाढवले पाहिजे कारण ह्यामधूनच आपल्या शरीराला आव्यश्यक असे फायबर उपलब्ध होणार आहेत.
आपल्या खाद्यामधून आपल्याला दोन प्रकारचे फायबर मिळतात जे शरीरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे! अशा प्रकारात येतात. ह्यामध्ये न विरघळणारे फायबर न पचता तसंच बाहेर पडतात, तर विरघळणारे फायबर पोटात पाणी शोषून घेतात. न विरघळणारं फायबर आपल्याला भाज्या आणि सुका मेवा, यातून मिळतात. विरघळणारे फायबर आपल्याला पपई, संत्रं, पेरू यासारखी फळं, ओट्‌स आणि सोयाबीनचे पदार्थ यातून मिळतात.
हल्लीच्या पिढीमध्ये फास्ट फूडची क्रेज भरपूर आहे पण ह्या फास्ट फूड पदार्थांतून आपल्या शरीराला  बिलकुल फायबर मिळत नाही. म्हणूनच ते शरीराला चांगले नसतात. त्यामुळेच फास्ट फूडने रक्तातली साखर लवकर वाढते  आणि त्यामुळे वजनही वाढतं. याउलट जास्त फायबर असणारे पदार्थ हळूहळू पचतात आणि त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. याचाच अर्थ असा की फायबर जास्त समाधान देतात आणि कॅलरीजची काळजी करणाऱ्या लोकांसाठी चांगले असतात.
फायबरचे फायदे
फायबरने पोट लवकर भरतं आणि समाधानही मिळतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला याची मदत होते. तसेच पोटही व्यवस्थित साफ होते. आपल्या शरीरात प्रदूषण आणि फास्ट फूड तसंच इतर रासायनिक पदार्थ अनेक मार्गांनी रोजच्या रोज प्रवेश करतच असतात. ह्यातील अनेक घटक हे कॅन्सरला कारणीभूत ठरणारे असतात, फायबरमुळे हे हानिकारक घटक शरीरातून लवकर बाहेर फेकले जातात आणि त्यांच्या वाईट परिणामांची तीव्रता खूपच कमी होते.विरघळणारे फायबर रक्तातील कॉलेस्ट्रॉलसारखे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे रक्ताततील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ज्यांना डायबेटीस आहे अशांना रक्तातील साखरेची पातळी नॉर्मल राहण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा फार उपयोग होतो. पण फायबर कितीही चांगलं असलं तरी ते आहारात एकदम वाढवू नये, तर हळूहळू वाढवावे कारण जर एकदम वाढवले तर पोट बिघडू शकतं. त्याचा अतिरेक झाल्यास शरीराला आवश्यमक असणाऱ्या झिंक, कॅल्शियम, लोह अशा क्षारांची कमतरता निर्माण होऊ शकते.
आहारातील फायबर कसे वाढवाल?
१. फळं, भाज्या आणि सुका मेवा उदा. अंजीर, मनुका आवर्जून खावेत.
२. ज्या फळांची आणि भाज्याची साले खाता येतात, ते जरूर सालांसकट खावेत. उदा. सफरचंद, बटाटा वगैरे.
३. कच्च्या कोशिंबिरी आणि फळं यांचा आहारात समावेश असावा. तसेच धान्यं, कडधान्यं खावीत.
४. पांढरा भात आणि पांढरा ब्रेड यापेक्षा ब्राउन राइस आणि ब्राउन ब्रेडचा वापर प्रामुख्याने करावा.
५. हे सर्व करताना दिवसभरात भरपूर पाणी प्यावं म्हणजे खाल्लेल्या फायबर पदार्थांचा नीट शरीराला उपयोग होईल.

Regards


(Image From) https://in.pinterest.com   

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

शारीरिक आणि मानसिक पोषणाचे महत्त्व!!!

शारीरिक आणि मानसिक पोषणाचे महत्त्व!!!


चांगले आरोग्य जर हवे असेल तर योग्य पोषक आहार घेणे गरजेचे आहे आणि शरीराचे योग्य पोषण म्हटले की योग्य आहार हा घेतलाच पाहिजे पण शरीराच्या पोषणाबरोबरच मनाचे पोषणसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपण टीव्हीवर अनेक अन्नपदार्थांचे पोषण मूल्य वाढवणारी नवीन नवीन उत्पादने पाहतो आणि घेतोही. पण मनाचे पोषण होण्याची गरज बऱ्याच कमी लोकांना वाटते, उलट मनाला पोषक अशा फार थोड्या गोष्टी होत असतात.

आपले संपूर्ण कुटुंब महिन्यातून एकदा सिनेमा पाहायला, दर आठवड्याला हॉटेलमध्ये जेवायला  अगदी न चुकता जातो. पण कोणी मुद्दाम मुलांना दर आठवड्याला एखादे चांगले पुस्तक वाचायला देणे, शाळेत जे विज्ञान शिकतो त्यातील पान आणि फुलांचा बागेत जाऊन अभ्यास करणे, ट्रेकिंगला जाणे, गडकिल्ल्यांची माहिती देणे, थोर लोकांची महती सांगणे असे करताना दिसत नाही आणि ह्याचे प्रमाण खूपच कमी आहे. खरेतर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते.
आपले शरीर ज्या घटकांचे बनलेले आहे, ते घटक शरीराला अखंडपणे पुरवत राहणे, हा तर एक पोषणाचा भाग आहे आणि ते तर बरेच लोक करताना दिसून येतात. रोजच्या गरजांच्या मधले भात, भाजी, वरण, पोळी हे अगदी साधे पोषण रोजच होत असते. पण आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक बारीक-सारीक पोषणतत्त्वांची गरज असते. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ समावेश करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्याचे प्रमाण किती असावे, हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

आपल्या आहारात वरण, भात, भाजी, पोळी ह्यांचा समावेश तर असावाच पण सुक्याा मेव्याचे ( ड्राय फ्रुट्स)  प्रमाण देखील असावे कारण सुक्याा मेव्यात असलेली पोषणतत्त्वे ही अतिमहत्त्वाची तर आहेतच, पण ती अतिसूक्ष्म व तुलनेने कमी प्रमाणात लागणारीही आहेत. तसेच आपल्या शरीराला लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्रोटिन्स आणि ह्यांचा मुख्य स्त्रोत म्हणजे डाळी कडधान्ये. आपल्या जेवणामध्ये याचा भरपूर प्रमाणावर वापर रोजच्यारोज करायलाच हवा. तसेच आपल्या आहारात ड्राय फ्रुट्सचे प्रमाणही योग्य असावे आणि नेहमीच हे ड्राय फ्रुट्स आलटून पालटून थोड्या प्रमाणात घेतले पाहिजेत, ज्यायोगे शरीराचे सर्वसाधारण नव्हे तर संपूर्ण पोषण होईल.
एकाच प्रकारचे जेवण न करता आपल्या आहारात नेहमीच काहीतरी बदल आपण केला पाहिजे जसे की फळे. बाजारात उपलब्ध असलेली फळे आपल्या आहारात नेहमी असावीत ज्याने शरीराचे पूर्ण पोषण होण्यास खूपच हातभार लागू शकतो. तसेच आपल्या जेवणात नेहमी वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. पालेभाज्या, सलाड, असे विविध प्रकार खावेत म्हणजे जे पोषकतत्त्व इतर अन्नातून नाही मिळाले ते ह्यातून मिळून जातील. ह्या सगळ्याचे कारण एकच की एक प्रकारच्या अन्नधान्यात जे नाही ते दुसऱ्यात आहे. अशा पद्धतीने आपण शरीराचे पोषण करून शकतो.
सर्व पोषकतत्त्वे उत्तम पद्धतीने हव्या त्या पद्धतीने मिळत राहिल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहीलच, पण त्यासोबत मेंदूचीसुद्धा कार्यक्षमता वाढण्यास खूप हातभार लागेल. पण आज अनेक स्त्रियांना बहुतेकवेळा पोषण तत्वांच्या अभावामुळे हायपर किंवा हायपो थायरॉईडचा त्रास असतो. हाडांची ठिसूळता, स्नायूंचे आकुंचन प्रसरण होण्याची क्षमता, मानसिक अस्वास्थ्य, इत्यादी त्रास आजकाल सर्वसामान्य आहेत.

आपल्याला असलेल्या शारीरिक आजारांसाठी काय पोषण असावे हे तज्ज्ञ लोक सांगू शकतात पण तरीही वर सांगितल्याप्रमाणे सर्व अन्न घटकांचा आलटून पालटून समावेश असणे व संतुलित आहार हेच त्याचे उत्तर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळिशीत सुरू झालेल्या त्रासाचे कारण हे खरेतर – लहानपानापासून किंवा काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कुपोषणाचा किंवा अयोग्य आहाराचा परिणाम असतो. कारण पूर्वीपेक्षा आरोग्याच्या तक्रारीमध्ये हल्लीच्या काळात खूपच वाढ झाली आहे.
ही सगळी परिस्थिती बघता, नियमित संतुलित आहार, व्यायाम, भरपूर पाणी, चाळिशीनंतर काही आरोग्य विषयक चाचण्या करणे आवश्याक झालेले आहे. मनाच्या पोषणासाठी उत्तम विचार असलेल्या लोकांशी मैत्री, उत्तम पुस्तके, ध्यान, प्राणायाम, उत्तम विचारांचे आदान प्रदान, छंद जोपासणे, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव येणाऱ्या गोष्टींपासून लांब राहणे, आवश्याक आहे. ह्या सर्वांसाठी सकारात्मक प्रयत्न हवेत. हेच मनाचे पोषण होय. आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानास्किकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची खूपच गरज आहे. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ मिळतात ना, हे बघणे खूप गरजेचे आहे. आपल्याला सर्वसाधारण पोषण म्हटले की शरीराचे असे चटकन डोक्यात येते, पण फक्त शरीराचे पोषण पुरेसे नाही हेसुद्धा लक्षात घायला हवे. मनाचे पोषण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपण टीव्हीवर अनेक अन्नपदार्थांचे पोषण मूल्य वाढवणारी नवीन नवीन उत्पादने पाहतो आणि घेतोही. पण मनाचे पोषण होण्याची गरज फारच कमी लोकांमध्ये आढळून येते आणि बरेच लोक ह्यासाठी अजूनही तयार नाहीत. खरेतर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते.


Regards


 


(Image From) http://therebelworkout.com  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

गरज मानसोपचाराची

गरज मानसोपचाराची


जगात एक अशी गोष्ट आहे की जी वेगळी होऊ शकत नाही आणि ती गोष्ट म्हणजे आपले शरीर व मन , ते कधीच एकमेकांपासून वेगळे करता येत नाही, माणूस म्हणजेच शरीर, बुद्धी व मन याचा त्रिवेणी संगम आहे. एखादी जखम झाली तर आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो; परंतु मन आजारी पडले तर कित्येकदा आपल्याला कळतही नाही. मन आजारी पडणे म्हणजेच मानसिक आजार होय हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे.

सर्वप्रथम आपण मानसिक आजार म्हणजे काय व तो कुणाला होऊ शकतो? हे समजून घेतले पाहिजे जसे की हल्ली दररोज आपण टी. व्ही. वर किंवा वृत्तपत्रात भडक बातम्या वाचतो व पाहतो. उदा. खून, मारामाऱ्या, विध्वंसक वृत्ती, आत्महत्या, चोऱ्या, बलात्कार, अंधश्रद्धा वगैरे, ह्या सर्व विकृती झपाट्याने जगभर वाढू लागल्या आहेत आणि ह्याचा थेट परिणाम मानवी मेंदूवर नकळत होऊ लागला आहे त्यामुळेच भारतात व इतरही देशांत मानसोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा व यामुळे उद्‌भवणाऱ्या मानसिक समस्या व विकृती, उदासीनता, टेन्शन, भीती, असुरक्षितता, न्यूनगंड ह्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. ह्या अशा गोष्टींमुळे बदलणारे जीवनमान व त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक ताणतणाव, वाढत्या अपेक्षा, नोकरी- धंद्यातील अपयश, असाध्य गोष्टी मिळवण्याचा अट्टहास, शैक्षणिक, वैवाहिक किंवा प्रेमात येणाऱ्या अपयशातून निर्माण होणारे नैराश्य अशा असंख्य गोष्टी मानसिक असंतुलनास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच जर आपल्या वागण्यात जर विक्षिप्तपणा वाढत असेल तर ताबडतोब मानसोपचारांचा सल्ला घेतल्यास पुढील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. तसेच सर्वप्रथम वेडेच लोक मानसोपचारांचा सल्ला घ्यायला जातात हे मनातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजे कारण आताच म्हंटल्याप्रमाणे जागतिक बदलाला जर तुम्हाला सामोरे जायचे असेल तर तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम असलेच पाहिजे कारण मानसिक आजाराची लक्षणे ही कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकतात.

हल्लीच्या लहान मुलांमध्ये जर तुम्ही पहिले तर हट्टीपणा, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, उदासीनता, विध्वंसक वृत्ती, शैक्षणिक तक्रारी, भीती, असंबद्ध बडबड, विक्षिप्तपणा ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तसेच अल्पवयीन मुलांमध्येही वरील लक्षणे तसेच हार्मोन्सच्या बदलामुळे व्यक्तिपमत्त्वाच्या समस्या, न्यूनगंड, शैक्षणिक स्पर्धेच्या युगात वाढत्या अपेक्षा व टेन्शन, भीती व आत्महत्येचा प्रयत्न, तसेच हल्ली टी. व्ही. मालिका, सिनेमा, जाहिरातींचा मुलांच्या मनावर व व्यक्ति्मत्त्वावर फार मोठा प्रभाव कळत नकळत पडत आहे. त्यातूनच मुक्त् जीवन पद्धतीचे अनुकरण, भौतिक सुखसुविधांचे आकर्षण, ते मिळविण्यासाठी काहीही करण्याची तयारी, त्यातील अपयशामुळे नैराश्य, उदासीनता, आत्मघातकीपणा व आत्महत्येचा अविचार, व्यसनाधीनता,पराकोटीची ईर्षा व हिंसात्मक प्रवृत्ती बळावते आहे. स्त्रियांच्या मानसिक समस्या, कौटुंबिक व वैवाहिक जीवनातील समस्या, तसेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्वभावातील चिडचिडेपणा, असुरक्षिततेची भावना, औदासीन्य ह्या आणि अशा बऱ्याच मानसिक आजाराशी निगडित गोष्टी हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत.


नोकरी करणाऱ्यांच्या, बिझिनेसमेन किंवा एक्झि क्युटिव्ह वर्ग यांच्यावर स्पर्धेच्या युगात कामाच्या दडपणामुळे (स्ट्रेस) निर्माण होणारे टेन्शन, वाढणारा रक्त दाब, तसेच इतर समस्यांसाठी कौन्सिलिंगचा लाभ हल्ली मोठ्या शहरातील बरीच मंडळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन घेऊ लागली आहेत आणि ते त्यांच्या प्रोफेशनल लाइफ मध्ये टिकून राहण्यासाठीही त्यांना उपयुक्त ठरत आहे. जर मानसिक ताणामध्ये वेळीच उपचार न घेतल्यास वाढत्या रक्तदाबामुळे हृदयावर परिणाम होऊन हल्ली हार्टऍटॅकचे प्रमाण 30 ते 40 या वयोगटात मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. तसेच आज बऱ्याच लोकांना स्ट्रेस, डायबिटीस (मधुमेह), दमा, यासारख्या समस्याही लहान वयात होताना दिसून येत आहेत. त्यामुळे कित्येक मंडळींत अनामिक भीती, असुरक्षितता व त्यातून त्यांच्या रोजच्या दैनंदिन कामावर होणारे दुष्परिणाम दिसून येत आहेत. पोलीस डिपार्टमेंटमधील लोकांमध्ये ह्याचे प्रमाण खूपच मोठे आहे कारण कामाचे टेन्शन व कामाचे स्वरूप, न मिळणाऱ्या सुट्ट्या, त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक ताणतणाव व व्यसनाधीनता, निद्रानाश यामुळे ही मंडळी सुद्धा कायम एका ताणतणावाखाली काम करत असतात.

मानसिक आजारामुळे त्या व्यक्तीचा बऱ्याचदा कामाचा वेगही मंदावतो, शारीरिक व्याधींनाही तो हळू हळू बळी पडू लागतो. जर अशा परिस्थितीत योग्य वेळेस जर कौन्सिलिंग केले तर त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो व ही व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत तसेच त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाबरोबर सहजतेने वागू शकते.


तसेच अनेकदा व्यक्तिमत्त्वाच्या समस्याही बऱ्याच प्रमाणात आढळतात, त्यासाठी कौन्सेलिंगचा भरपूर फायदा होतो. त्यामुळे हल्ली मोठ्या शहरात मानसोपचार तज्ज्ञाला वेड्यांचा डॉक्टर म्हणण्याची प्रथा आता कमी होत असलेली आढळून येते. किंबहुना वेडे व्हायचे नसेल तर लवकरच मानसोपचार तज्ज्ञांकडे जावे, ही काळाची गरज आहे, हे आजच्या सुशिक्षित व्यक्तींना पटलेले आहे. हे तर झाले मोठ्या शहरांच्या बाबतीत पण आजही लहान गावात व अशिक्षित वर्गात मानसिक आजारांबद्दल माहिती नसल्यामुळे अजूनही खेडेगावात मानसिक आजार विकोपास गेल्यानंतरच रुग्ण मानसोपचार तज्ज्ञांकडे जातात किंवा असे रुग्ण कित्येकदा स्वत: आत्महत्या तरी करतात किंवा खून करतात. त्यासाठीच   समाजात मोठ्या प्रमाणात मानसिक आजारांबद्दल जागृती निर्माण करणे हे गरजेचे आहे.Regards


 

(Image From) https://www.assignmenthelphub.com

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:बुधवार, २४ जानेवारी, २०१८

बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-२)

बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-२)


लक्षात ठेवा
मुलांच्या पालकांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की शाळेत जाण्यापूर्वीची काही वर्षे (3 ते 4 वर्षे वय) म्हणजे जन्मानंतरचा मेंदूच्या वेगवान वाढीचा काळ असतो आणि ह्याच वयात मुले आपल्या आईची पूर्ण भाषा शिकून बोलूही लागतात त्यावरून आपण सहजच अंदाज लावू शकता. याच काळात महत्त्वाची बौद्धिक आणि स्मरणशक्तीसंदर्भातील वाढ होते, मेंदू शरीरांतर्गत निरोपाची देवाण-घेवाण करण्यासाठीची क्षमता विकसित करतो. ह्याचकरता लहान मुलांचा आहार हा नुट्रीशन ने परिपूर्ण असावा. मानसिक आणि बौद्धिक वाढीचे विविध टप्पे बारकाईने तपासून बाळाच्या मेंदूच्या वाढीची कल्पना येते. यापैकी काही टप्पे माझ्या वाचनात आले ते मी आता सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा येथे प्रयत्न करणार आहे –
अपेक्षित मानसिक विकास
तीन ते चार वर्षे याकाळात मुले बोलायला शिकतात. त्याच्या शब्दकोशात साधारणत: काही थोडेच शब्द असतात. ह्याच काळात मुले काही वस्तूंचा वापर करून अनुकरण करायला शिकतात. चार ते पाच वर्षे याकाळात मुले प्रामुख्याने मोठी वाक्ये बोलायला लागते. पुस्तकांची पाने काळजीपूर्वक उलटायला शिकते, फोटो आणि खासकरून आई आणि वडील ह्यांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना ओळखायला शिकते.

आपण योग्य आहाराने शिकण्यातील अक्षमता टाळू शकतो
लहान मुलांचा मेंदू हा वेगाने वाढत असतो ह्याच काळात त्यांचा आहार हा न्यूट्रिशन ने परिपूर्ण असावा कारण आहारातील कमतरतांचा परिणाम मेंदूवर लगेचच होतो म्हणून मुलांना लहान वयात फास्ट फूडपासून लांबच ठेवावे. जर आहार व्यवस्थित असेल तर लहान वयात मुलांमध्ये अशी सवय विकास आणि वाढीला सहाय्यभूत ठरते, पण बालकांमध्ये पोषकद्रव्यांची कमतरता भासल्यास त्यांच्यात कालांतराने काही विकारांना आमंत्रणही ठरू शकते.
‘फास्ट फूड आरोग्यासाठी चांगले नाही” हे अगदी पूर्णपणे खरे आहे. कारण अशा अन्नात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी, कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ, प्रिझर्वेटीव्हस, साखर, मीठ, हानिकारक फॅट्‌स यांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. यामुळे विचारप्रक्रियेचा वेग मंदावून,एकाग्रतेवरही परिणाम होतो. अशामुळे लहान वयातच डोळे, जीभ यासारख्या ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊ लागतात. काही बालकांमध्ये तर डोळे व स्नायूंचा समन्वय साधता न येण्यासारखी आणि लहान-सहान अडचणी सोडवता न येण्यासारखी लक्षणेदेखील दिसतात. त्यामुळे शैक्षणिक अक्षमता (learning disabilities) निर्माण होण्याची शक्यता असते.
आहाराचा परिणाम बालकाच्या सामाजिक कौशल्यांवरही होतो
जर लहान वयात जर योग्य अन्नाची सवय नसेल तर मुलांची अपुरी मानसिक वाढ इतर अनेक ठिकाणी परिवर्तित होते. ह्याचा थेट परिणाम त्यांच्या सामाजिक विकासावरही( social skills) दिसून येतो. सारखी कुरकुर आणि हट्ट करणे, रागीटपणा आणि आततायीपणा करणे, मध्येच निराश होणे यातून मुलांचे कुपोषण दिसून येते. या काळात पालकांनी वागणूकीची लक्षणे ओळखली पाहिजेत आणि सुधारली पाहिजेत. बऱ्याचदा पालक जाऊ दे, लहान आहे, होईल शहाणा हळूहळू असे म्हणून बालकाकडे दुर्लक्ष करतात आणि परिस्थिती सुधारण्याची पाहिली संधी गमावून बसतात.

याकडेही लक्ष ठेवा
जी मुले सारखे हट्ट आणि चिडचिड करतात,पालकांचे, कुटुंबियांचे कधीच ऐकत नाही, उद्धटपणा करतात, अशावेळेस वेळीच मुलांच्या पालकांनी सावध पाऊल उचलावे आणि ह्याकडे गांभीर्याने पाहावे कारण येणाऱ्या काळात मुले मोठी झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
आपण काही करू शकतो का?

ह्या अश्या गोष्टी टाळण्यासाठी आणि बरे करण्यासाठी समतोल आहार नक्कीच मदत करतो. आहाराबाबतीतल्या चांगल्या सवयी लहान वयातच लावणे यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणून लहान मुलांना चांगल्या सवयी लावायला हव्यात आणि कोणते अन्न चांगले आणि कोणते आरोग्यासाठी अपायकारक ह्याचा फरक समजावून सांगावा. तसेच लहान वयातच त्यांना एक्झरसाइजचे महत्व पटवून द्यावे आणि टीव्ही, मोबाइल सारख्या वस्तूंपासून शक्यतो दूर ठेवावे.  

Regards

 


(Image From) http://www.domalochildcare.co.uk/  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.comमंगळवार, २३ जानेवारी, २०१८

बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-१)

बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-१)


आजच्या बदलत्या युगामध्ये मोठ्या व्यक्तींना निरनिराळ्या हेल्थ समस्यांना तर सामोरे जावे लागतच आहे पण हल्ली ह्याचबरोबर ह्या आजच्या बदलत्या युगात बालकांच्या आहाराबाबत सुद्धा त्यांचे पालक हे गोंधळलेले आहेत हे मान्य करायला हवे. आपल्या मुलांना स्वतःच्या धावपळीच्या जीवनातून वेळात वेळ काढून कोणत्या वयापासून काय आहार द्यायला हवा, लिक्वीड डाएटवरून सॉलिड डाएटवर कधी जावे किंवा अगदी सूप्स आणि फ्रुट्‌स कधी द्यावीत, हेच समजेनासे होते. कारण याच गोष्टीवर आपल्या मुलांच्या शरीराची ठेवण आणि आरोग्य अवलंबून असते. लहान वयातच आहार नीट मिळाला तर मुलांची वाढही योग्य होईल हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याविषयीच आज मी तुम्हाला येथे काही सांगणार आहे..…
मुलांचे पालक हे त्यांच्या आरोग्यदायी जीवनाचा पाया उभारण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात आणि बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि वर्तणुकविषयक विकासामध्ये समतोल आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही गोष्ट मुलांच्या पालकांनी नीट समजून घेतली पाहिजे. आजच्या घडीला आहाराच्या बाबतीत आपण दोन टोकांवर उभे आहोत – कुपोषण आणि अतिपोषण! लहान मुलांच्या आहारात मुख्य करून फास्ट फूड आणि प्रोसेस फूडचा अधिक वापर हल्ली होताना दिसून येतोय त्यामुळे प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजद्रव्यांकडे दुर्लक्ष होतेय.  आहारातील या असमतोलामुळे मुलांच्या आरोग्यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होत आहेत. त्यामुळे हल्लीच्या मुलांमध्ये स्थूलता, लहरी स्वभाव आणि चंचलता, अशा गोष्टी सातत्याने होताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शारिरीक अथवा मानसिक दुर्बलताही दिसून येत आहे.
योग्य वाढीसाठी उत्तम आहार महत्वाचा!
हल्लीच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण मुलांना देत असलेल्या आहारातले प्रत्येक पोषकद्रव्य बालकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्वाचे असते कारण लहान वयात बालकांच्या शरीरामध्ये पोषकद्रव्यांचे शोषण अतिशय प्रभावीपणे आणि वेगाने होते. त्यामुळे त्यांच्या दररोजच्या आहारात प्रत्येक पोषकद्रव्य योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. जनरल सायन्स आपल्या सर्वांनाच माहित आहे की बालकांची उंची, वजन, स्नायूंची ताकद, हाडांची व दातांची मजबूती, डोळ्यांची क्षमता पहिल्या १८ वर्षांपर्यंत झपाट्याने वाढत असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना लहान पणापासूनच उत्तम दर्जाची प्रथिने, आवश्यचक मेदाम्ले, लोह-कॅल्शियम-मॅग्नेशियमसारखी खनिजद्रव्ये, पाण्यात व मेदात विरघळणारी जीवनसत्वे त्यांच्या रोजच्या आहारात अवश्य् समावेश करायला हवीत.
तुमच्या पाल्याचे दात किडलेत का? किंवा लहान वयातच हाडे दुखतायत का???

वेफर्स, बेकरीतले पदार्थ, शीतपेये, पॅकबंद ज्यूसेस, आणि रेडी-टू-सर्व्ह पदार्थ असे साखर आणि फॅट्‌स जास्त असणारे पदार्थ सर्वप्रथम जर पालकच खात असतील तर त्यांनी आधी ते स्वतः बंद करावेत कारण लहान मुले ही सर्व प्रथम आपल्या आई वडिलांना फॉलो करतात म्हणून जर पालकांनी रोज पोषक आहार घेतला तर मुलेही तोच आहार घेतील कारण फास्ट फूड हे कालांतराने अनेक आजारांना आमंत्रणच ठरतात आणि ह्याचाच दीर्घकालीन परिणाम म्हणजे मधुमेह, उच्चरक्त/दाब, कर्करोग यांसारख्या आजारांशी गाठ पाडण्यात होऊ शकतो.

Regards

 (Image From) https://www.hsph.harvard.edu


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

सोमवार, २२ जानेवारी, २०१८

जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याचे दुष्परीणाम

जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याचे दुष्परीणाम 


बऱ्याच जणांना दुपारी जेवल्यानंतर एक छोटी डुलकी घ्यायची सवय असते तसेच अवेळी आणि जेवल्यावर लगेच झोपे येणे धोकायदायक आहे, म्हणूनच अशी झोप टाळली पाहिजे, कारण जेवल्यावर लगेच झोपणे धोकादायक ठरू शकतं. कारण जेवल्यानंतर, नाष्टा केल्यानंतर किंवा काहीही खाल्यानंतर लगेचच झोपणं हे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं.
चयापचय म्हणजे पचनास अडथळा
वर म्हटल्याप्रमाणे जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. तज्ज्ञांच्या मते आणि संशोधनातून समोर आलेल्या रिझल्ट वरून असे सिद्ध झाले आहे की  जेवल्यावर तातडीने झोपल्यास शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होतं आणि ते छातीत जातं. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. शिवाय अन्नाचं योग्य पद्धतीने पचन न झाल्यास भविष्यात अनेक आजारही जडू शकतात.

वजन वाढण्याचे दुष्परीणाम

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. आपणं जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणं गरजेचं असतं. यामुळे शरीराचं कार्य उत्तम राहण्यास मदत होते तसेच वजनही आटोक्यात राहण्यास मदत होते.

अॅसिडीटीचा त्रास वाढतो

जेवल्यानंतर तातडीने झोपल्याने पोटात आम्ल तयार होतं. यामुळे अॅसिडीटी होण्याची दाट शक्यता असते आणि ह्या अॅसिडीटीमुळे शरीराला फार त्रास होतो, शिवाय झोपही लागत नाही.

हृदयासंबंधीचे आजार बळावतात


जेवल्या जेवल्या लगेच झोपल्याने पचनक्रिया बिघडते तसेच परिणामी  रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढायला लागते. यामुळे हृदयावर परिणाम होऊन त्यासंबंधीचे आजार कालांतराने बळावतात म्हणूनच जेवल्यावर तातडीने झोप घेणे धोकेदायक आहे.


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

रविवार, २१ जानेवारी, २०१८

ह्या सवयींमुळे आजारपण जाईल पळून!

ह्या सवयींमुळे आजारपण जाईल पळून!

आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्याला कित्येक प्रकारचे आजार असलेले नजरेस येतात आणि ह्यातील बहुतेकांच्या आजाराचे मुख्य कारण हे त्यांची आत्ताची जीवनशैली असून धकाधकीच्या आणि गुंतागुतीच्या जीवनशैलीचा परिणाम अशांच्या आरोग्यावर झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर प्रदूषण, अपूरी झोप, अवेळी खाणे, ताण या सगळ्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते आणि ह्यातील प्रदूषण आपण रोखू शकत नाही पण इतर गोष्टी नक्कीच व्यवस्थितपणे आत्मसात करू शकतो आणि काही चांगल्या सवयींनी आपण सध्याच्या लाईफस्टाईल डिसीजवर नक्कीच मात करू शकतो. तर आता आपण जाणून घेऊया या सवयींविषयी...

सकारात्मक विचार करावा

हे जरा वर वर पाहिले तर काहींना जरा पचणे जड जाईल पण सुखी आणि यशस्वी आयुष्याचा मुख्य कानमंत्र हाच आहे तसेच जर आपण पाहिले तर जीवनात आपण नेहमीच आनंदी राहू शकत नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपण दुःखी असतो, त्रासलेले असतो. अशा वेळेस मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि ह्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच येतात मात्र अशा परिस्थितीत नकारात्मक विचार करणे योग्य नाही. कारण आपल्या मनाची शक्ती अपरंपार आहे.

म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. तशी सवयच लावून घ्या. त्यामुळे तुमचा ताण-तणावही कमी होईल. स्वतःच्या बाबतीत जर काही नकारात्मक घडले असेल तर नीट शांतपणे त्याचा विचार करा आणि ही गोष्ट माझ्याबरोबर का घडली ह्याचे मूळ कारण शोधा तुम्हाला भविष्यात अशा प्रसंगात ते नक्कीच उपयोगी पडेल.

भरपूर पाणी प्या

चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले आणि कुठेही सहज उपलब्ध असलेले पेय म्हणजे पाणी, आपल्या शरीराचा ७२% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे म्हणूनच रोज कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तज्ञ लोकांच्या रिपोर्टनुसार, शरीराच्या वजनाच्या २० किलोमागे एक लीटर पाणी प्यायला हवे. म्हणजेच जर तुमचे वजन ६० किेलो असेल तर दिवसभरात रोज ३ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे आणि जर ३ लिटर शक्य नसेल तर आयडिअली २ लिटर पाणी प्यायलाच हवे.


गरम पाणी प्या

ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या सर्दी किंवा खोकला झाल्यावर गरम पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र त्याव्यतिरिक्तही नेहमी किंवा सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्यास खूप फायदा होईल कारण गरम पाण्याने आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ ( टॉक्सिन्स ) शरीराबाहेर काढून टाकण्यास खूपच मदत होते.

व्हिटॉमिन सी चे सेवन

मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास व्हिटॉमिन सी फायदेशीर ठरते म्हणूनच आपल्या आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा नेहमी समावेश करावा.

 

Regards

 (Image From) https://www.healthykids.nsw.gov.au


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

शनिवार, २० जानेवारी, २०१८

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी काही खास टिप्स...

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी काही खास टिप्स...


सध्याच्या फास्ट लाइफमध्ये बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे, पण ह्याचे जर मूळ कारण शोधले तर बऱ्याचदा आपल्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे पोटाच्या समस्या ह्या जास्त प्रमाणात होतात. जर ह्यावर यशस्वीरीत्या मात कराची असेल तर प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी....

१. फायबर्स भरपूर प्रमाणात खा:

फळे, भाज्या यांसारख्या फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारातील समावेश वाढवल्यास पोटातील हेल्दी बॅक्टरीयांचे प्रमाण देखील वाढेल आणि त्यामुळे तुमची भूकही कंट्रोल मध्ये राहील. तसेच चांगल्या फिटनेससाठी तज्ज्ञांच्या मते  दिवसभरात तुम्ही सुमारे ३० ग्रॅम फायबर्स घ्यायला हवेत.

२.धान्य खा: ( स्प्राऊट्स )

आहारात धान्यांचा समावेश केल्याने इम्म्युनिटी, मेटॅबॉलिझम आणि पोटातील चांगल्या बॅक्टरीयांचे प्रमाण सुधारते तसेच वजनही कंट्रोलमध्ये राहते कारण अशा पदार्थांच्या सेवनाने मुख्यत्वेकरून भूक आटोक्यात राहण्यास खूपच मदत होते आणि तुम्ही इतर फास्ट फूड खाण्यापासून दूरच राहता.

३.व्यायाम:
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम करायला वेळ न मिळणे हि बऱ्याच जणांची समस्या आहे पण जर तुम्हाला खरोखरच जर एक निरोगी आयुष्य जगायचं असेल तर व्यायाम हा केलाच पाहिजे आणि अगदीच नाही तर निदान रोज अर्धा तास सकाळी चालायला किंवा सायकल चालवायला गेलेच पाहिजे कारण व्यायामामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. व्यायामामुळे घाम येतो आणि अधिक फायबर्स व कार्ब्स खाल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा कायम राहते. परिणामी पोटाचे आरोग्य सुधारते. तज्ञांच्या संशोधनानुसार आज जगात ७०% आजार हे पोटामुळे होत आहेत आणि ह्याचे मुख्य कारण आजची बदलती जीवनशैली हे आहे.

४. अँटिबायोटिक्स घेणे कमी करा:
बऱ्याचदा लोक हताश होऊन घरगुती उपाय करण्यापेक्षा पटकन आणि लवकर इफेक्ट देणाऱ्या अँटिबायोटिक्स कडे जास्त वळतात आणि ह्याचे प्रमाण हल्ली संशोधकांच्या सर्वेक्षणातून खूपच वाढताना दिसून आले आहे पण तुम्ही हे लक्षात घ्या की अशा अँटिबायोटिक्समुळे पोटातील चांगल्या आणि हानिकारक अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टरीयांवर परिणाम होतो. म्हणून अँटिबायोटिक्स टाळणे शक्य नसल्यास त्यासाठी डॉक्टरांना दुसरा सुरक्षित पर्याय विचारा. 

Regards

 


(Image From) https://www.slideshare.net


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

खजूर खाण्याचे फायदे...

हे' आहेत खजूर खाण्याचे फायदे...


तसे पाहायला गेले तर आपल्या आजूबाजूला जसे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात अव्हेलेबल आहे तसेच असेही खाद्य आहे जे खूप मोठ्या प्रमाणात अव्हेलेबल आहे ज्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि त्यातलेच एक आहे जे वर्षभर अव्हेलेबल असते आणि बऱ्याच लोकांना देखील आवडते आणि ते म्हणजे खजूर!!!! खजूर आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धक देखील आहे हे तर बरेच लोक जाणतात. खजूर रोज खाल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. त्यामुळेच तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात याचा अवश्य समावेश करा आणि आपण ह्याचे मूलभूत फायदेही आता पाहणार आहोत.

१. खजूर खाल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात. त्यामुळे चेहऱ्यावर आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. थोडक्यात खजुरामुळे मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.
२. खजूरमध्ये असलेल्या व्हिटॉमिन सी मुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि सुरकुत्यांपासून त्वचा सुरक्षित राहते.
३. खजूरात असलेल्या व्हिटॉमिन बी मुळे पिंपल्स, आणि स्ट्रेच मार्क्स दूर होतात. तसेच ह्यात  झिंक असल्याने रोज खजूर खाल्याने केस काळे आणि दाट होतात.
४. खजूरात लोह अधिक असते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सध्या बऱ्याच लोकांना सतावणारी  केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.
५. यात असलेल्या अॅंटीऑक्सिंडेंट्समुळे फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी होतो. यामुळे वाढत्या वयातही सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते.

 

Regards

 (Image From) https://www.organicfacts.net


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

बदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?

बदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?

ड्राय फ्रुट्स मध्ये सर्वात जास्त कोणता पदार्थ लोकांना आवडत असेल तर तो आहे बदाम, म्हणूनच बदाम हे सर्वात पौष्टिक पदार्थ आपल्या आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे. बदामाने शरिरात ऊर्जा निर्माण होते. तसेच ज्यांना आपले वजन कमी करायचे असेल त्यांनी नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. संशोधकांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश नक्की समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारून वारंवार लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळवता येते.

बदामाचे उपयोग 

१. बदामातील बी जीवनसत्व  बुद्धीच्या वाढीसाठी उपयुक्त असून रात्री दोन - तीन  बदाम भिजत घालावेत आणि सकाळी ७ वाजता ( शक्य तेवढ्या लवकर ) त्यांचे सेवन करावे ... त्यामुळे शारीरिक क्षमता तर वाढतेच पण बुद्धीही वाढायला मदत होते.
२ . तुमच्या अंगाला जर खाज सुटत असेल तर बदाम तेलाने मालिश करावी ... लहान मुलांसाठी मालिश करण्यासाठी बदाम तेल उत्तम पर्याय आहे.
३ . केसांसाठी देखील बदाम तेल उत्तम असून डोक्याला बदाम तेलाने मालिश केली की केस वाढण्यास आणि ते मजबूत होण्यास मदत होते.
बदाम का भिजवून खावेत? 
आपण बऱ्याचदा पाहतो की बदाम नेहमी भिजवून खाल्ले जातात, तसेच बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदामामध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात.

बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्यामुळे  त्याच्यावरचं साल सहज निघून जाते.बदामावरची साल  बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. संशोधनानुसार बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल काढले किंवा ठेवले तरी त्याचा शरीरास काही अपाय होणे नाही.


मधुमेह झाल्यास फायदेशीर आहे बदाम.


सध्या मधुमेहाचे प्रमाण भरपूर वाढत चालले आहे म्हणूनच तज्ञांच्या म्हणण्यानुसार मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे.याशिवाय यामध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेशी संबंधित आजारांमध्ये फायदा मिळतो. तज्ञांच्या सखोल संशोधनादरम्यान हे स्पष्ट झालं आहे की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होण्यास मदत होते आणि  हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.


Regards

 (Image From) http://swatisani.net


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

बुधवार, १७ जानेवारी, २०१८

वर्कआऊटआधी हे सुपरफूड खा!

वर्कआऊटआधी हे सुपरफूड खा!


सध्या लोकांचे जीवन हे खूपच धावपळीचं झालं आहे आणि अशातच स्वतःचा स्टॅमिना पण मेंटेन ठेवण्याचे मोठे कडवे आव्हान आज लोकांसमोर आहे आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे आजची बदललेली जीवनशैली, त्यातही तुम्ही रोज वेळात वेळ काढून वर्कआऊट करत असाल आणि घाम गाळत असाल तर ते उत्तमच आहे पण तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही आणि हीच गोष्ट बऱ्याच लोकांना समजण्यात उशीर होतो. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला असे काही सुपरफूड सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वर्कआऊटचा परिणाम दिसण्यास मदत होईल. हे सुपरफूड खाल्ल्याने स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढण्यास मदत होईल.
१ . केळं – स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात. त्यामुळे वर्कआऊटआधी काही वेळ अगोदर केळी खाल्ली तर त्याचा नक्कीच फायदा आहे.
२ . ड्राय फ्रूट – सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाणं चांगलं असतं.
३ . ओट्स – ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे दिवसभर अंगात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खाल्ले तर खूपच चांगले आहे.
४ . फ्रूट – फ्रुट्स ही शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी खूप उपयोगी आहेत आणि डॉक्टरही बऱ्याचदा फ्रुट्स खाण्यास सांगतात. शिवाय फ्रूट्समुळे दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचं तेज राहतं.
५ . चणे – सगळ्यात स्वस्त आणि मस्त कुठले खाद्य असेल तर ते उकडलेले चणे म्हणूनच जर  वर्कआऊटआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला हवेत.
६ . अंडी – वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असलेली अंडी खाल्ल्याने विशेषत: वर्कआऊटआधी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते. हे ही एक स्वस्त आणि उपयुक्त खाद्य आहे.
७. कडधान्य – वर्कआऊटआधी आहारात उकडलेले कडधान्य खाल्यास शरीराला खूपच फायद्याचं ठरतं.
८ .पनीर – पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असतं. वर्कआऊटआधी पनीर खाणं हा चांगला पर्याय आहे आणि हल्ली वाण्याच्या दुकानात किंवा सुपरमार्केट मध्ये पनीरचे रेडिमेड क्यूब मिळतात.
९ . चिकन आणि ब्राऊन राईस – संध्याकाळी आणि रात्री वर्कआऊटसाठी चिकन आणि ब्राऊन राईस हा एक उत्तम पर्याय आहे. यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच वर्क आउट मध्ये जास्त मस्क्युलर बॉडी बनवायची असेल तर चिकन आणि ब्राऊन राईस नक्की खावा आणि अंड्यांचे प्रमाणही योग्य मार्गदर्शनाखाली वाढवावे.

Regards


 

(Image From) https://www.pinterest.com  


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...