दही भात खाण्याचे फायदे!

दही भात खाण्याचे फायदे!


आपल्या बऱ्याच लोकांमध्ये हा समाज आहे की भात खाल्ल्याने वजन वाढतं तसेच पोट सुटतं, म्हणून बरेच जण आपल्या रोजच्या आहारात भात कमी जेवतात. पण मी तुम्हाला येथे आज दही भात खाण्याचे काही फायदे सांगणार आहे कारण दही भात खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरू शकते आणि ह्याने वजन कमी होण्यासही मदत होते. आजकालच्या फास्ट आणि व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत, पूर्वीच्या काळी दही भात हा आवर्जून घराच्या जेवणात खाल्ला जात असे तर आता आपण ह्याचे काही फायदे जाणून घेऊया.

 

वजन कमी होण्यास मदत होते

दही भात नियमित खाल्याने शरीरातील कॅलरीज कमी होऊन अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते.

तापावर आल्यावर फायदेशीर

साधारण ताप आल्यावर आपल्या बऱ्याच जणांना खाण्याची इच्छा होत नाही पण जर आपण दही भात खाल्ला तर आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळू शकते तसेच दह्यामुळे शरीराची इम्मुनिटी पॉवरही वाढते आणि वाढलेल्या इम्मुनिटी पॉवरमुळे लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.

पोट बिघडले असल्यास दही भात उत्तम

पोट बिघडल्यामुळे इतर पदार्थ खाण्यावर आपोआपच बंधने येतात अशा वेळेस दही भाताने पोट शांत होवून अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.

बद्धकोष्ठतेवर परिणामकारक

बद्धकोष्ठतेच्या त्रासात काही दिवस दही भाताचे सेवन केल्याने भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया आपल्या शरीरात जाऊन पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

तणावमुक्ती


दही भात खाल्याने तणाव कमी होतो कारण ह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्समुळे मुड सुधारण्यास मदत होते.


Regards
संबंधीत इमेज / चित्र :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या