जेवणानंतर चालण्याने होतात आरोग्यदायी फायदे

जेवणानंतर चालण्याने होतात आरोग्यदायी फायदेआपल्यापैकी बरेच जण हे सकाळी कामासाठी एकदा घराबाहेर पडले की दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेस घरी पोहचतात. अशा वेळेस बरेच जण हे दिवसभराचा ताण दूर करण्यासाठी टीव्ही पाहत आपला वेळ घालवतात आणि मग झोपी जातात. बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे आणि धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना व्यायाम करणे जमत नाही.  अनेक संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की,शरीराची हालचाल झाल्यामुळे आजार वाढण्याचे अनेक धोके कालांतराने संभवतात म्हणूनच वर्षानुवर्ष आपल्याकडे जेवणानंतर शतपावली करण्याचा नियम सांगितला आहे. ह्यासाठी जेवणानंतर किमान २०-२५ मिनिटं वेळ काढून चालण्याची सवय लावा. 

पचन सुधारण्यास मदत होते 

जेवणानंतर लगेच झोपणे हे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते म्हणून रात्रीच्या जेवणानंतर किमान तासांनी झोपावे, रात्रीच्या जेवणानंतर साधारण ३० मिनिटांनी, किमान २० मिनिटं चालल्याने अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यास मदत होऊन पित्ताचा त्रास होत नाही.

चांगली झोप येते

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना निद्रानाशाच्या समस्येने ग्रासले आहे आणि म्हणूनच ह्यावर मात करण्यासाठी औषध गोळ्यांऐवजी काही योगासन आणि चालण्याची सवय ही खूपच फायदेशीर ठरते. यामुळे रात्रीची शांत झोप येण्यास मदत होऊन रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते  

कमी झोप आणि अवेळी खाण्याच्या वेळांमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होतो पण जर रात्रीच्या जेवणानंतर २०-२५ मिनिटं चालल्यास हा व्यायामाचा एक उत्तम भाग बनू शकतो. यामुळे जीवनशैलीशी निगडित टाईप डाएबेटीस आटोक्यात राहण्यास मदत होऊन रक्तातील अनियमित होणाऱ्या साखरेचं प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होतें.   

वजन आटोक्यात राहते 

चालणं हा एक उत्तम व्यायाम समजला जातोजेवणानंतर चालल्यास तुमचे वजन आटोक्यात राहतेअनावश्यक कॅलरीज बर्न होण्यास मदत होतेत्यामुळे डाएटच्या सोबतीने किमान चालण्याचाव्यायाम केल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.  

मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होतें 

शरीराचे वजन कायम आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्या शरीराचा मेटॅबॉलिझम रेट नेहमीच  महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तो सुधारण्यासाठी डाएट जशी प्रमुख भूमिका पार पाडते तसेच त्याला योग्य व्यायामाची जोडही तेवढीच आवश्यक असते म्हणूनच शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी व्यायाम किंवा चालणं आवश्यक आहे.

Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.google.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या