नेहमी निरोगी राहण्यासाठीचे काही सोपे उपाय

नेहमी निरोगी राहण्यासाठीचे काही सोपे उपाय


बऱ्याचदा जेंव्हा आपण साधारण बरे वाटत नसल्यास जेंव्हा डॉक्टरांकडे जातो तेंव्हा डॉक्टरांचा नेहमीच पहिला प्रश्न असतो तो म्हणजे काळ काय खाल्ले होते किंवा तुम्ही गेल्या २ - ३ दिवसांचा मला दिनक्रम सांगा आणि बऱ्याचवेळा आजारी पडण्याचे कारण म्हणजे आपल्या काही नियमबाह्य सवयीच असतात. आयुर्वेदात सुद्धा म्हंटले आहे की बऱ्याच माणसांच्या अधिकांश आजारांचे कारण हे त्यांच्या लहान लहान सवयी होत. इथे मला आवर्जून सांगावेसे वाटते की जर आपण रोजच्या दिनक्रमाशी संबंधित असे काही नियम आहेत ज्यांचे नियमित पालन केले तर आपण नक्कीच निरोगी राहू शकतो.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्याप्रमाणे शरीराला योग्य प्रमाणात आहाराची, व्यायामाची गरज असते त्याचप्रमाणे शरीराला पुरेशी झोपही तेवढीच आवश्यक असते म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी व्यक्तीला सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते.
जेवल्यानंतर साधारण एक तासाने पाणी पिणे केंव्हाही चांगले कारण यामुळे पचनशक्ती वाढते व  स्किनही ग्लो करते. जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने पोटात गॅसेस होण्याची शक्यता वाढते आणि कालांतराने पोटही सुटते.
दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते आणि आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की मानवी शरीरात ७२% पाणी असते म्हणूनच साधारण २ लिटर पाणी दिवसभरात पिणे खूपच आवश्यक आहे.
चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम गरजेचा असून दिवसातील किमान अर्धा तास व्यायाम केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. जय व्यायाम करणे अशक्य असेल तर रोज सकाळी लवकर अर्धा तास तरी चालायला जा.
ह्या अशा सोप्या सोप्या गोष्टी आपण जर नीट पाळल्या तर आपण नक्कीच एक निरोगी आयुष्य जगू शकतो.
Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या