आपल्या चेस्टला मजबूत आणि आकर्षक बनविण्यासाठी करा हे एक्सरसाईज

आपल्या चेस्टला मजबूत आणि आकर्षक बनविण्यासाठी करा हे एक्सरसाईज


आजकाल जर आपण पहिले तर हल्लीची युवा पीढी आपल्या शरीराबद्धल प्रचंड जागृक आहे आणि आपले शरील तंदूरूस्त आणि तितकेच मजबूत असावे असे या युवा पीढीला प्रामुख्याने वाटते म्हणूनच ही पिढी चेस्ट, मसल्स बिल्डिंग यासारख्या गोष्टींवर जास्त भरत देताना आढळते .त्यासाठी ही आजची युवा पिढी  जीममध्ये जाऊन तासनतास एक्सरसाईजही करतात. अशा ह्या युवा पिढीसाठी मी येथे काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे.

बेंज प्रेस - 

हा व्यायामप्रकार जिममध्येच करावा आणि सुरवातीला सवय होईपर्यंत एक्सपर्टच्या मार्गदर्शना खालीच करावा, हा व्यायाम प्रकार करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही हातांनी बेंच बार मजबुतीने पकडा. बेंच बारचे वजन हे आपल्या क्षमतेप्रमाणेच घ्यावे. तो १० -१५ वेळा वर उचला आणि खाली घ्या. असे करण्याने शरीरातील मांसपेशी मजबूत होऊन चेस्ट रुंदावण्यास खूप मदत होते.

डंबल चेस्ट प्रेस -

काही लोकांना बेंच बारचा वापर करण्यासाठी अडचणी येतात. ह्यात प्रामुख्याने बेंच बार हा बऱ्याचदा एका बाजूला झुकतो आणि ब्यालन्स करायला अडचणी येतात अशा लोकांनी डंबेल्सचा वापर करावा त्यासाठी बेंचवर पाठीवर झोपा. दोन्ही हातांमध्ये डंबेल्स आपल्या क्षमतेप्रमाणे घ्या, आणि ते वर खाली करा.

पुश अप्स -

बऱ्याच पूर्वीपासून जेंव्हा जिमचे इंस्ट्रुमेंटही अस्तित्वात न्हवते अशा काळापासून चेस्ट रूंदावण्यासाठी जो  एक्सरसाईज केला जातोय तो म्हणजे पुश अप्स. हा एक असा व्यायामप्रकार आहे जो केव्हाही आणि कुठेही करता येऊ शकतो. 

डबंल फ्लाय -


हा जिममध्ये जाणाऱ्या लोकांचा सर्वात फेवरेट एक्सरसाईज आहे, जो चेस्टची हाडे मजबूत बनवून चेस्टला चांगला आकार मिळवून देतो. ह्या व्यायाम प्रकारात चेस्ट पंपींगही चांगल्या पद्धतीने होते. सुरवातीला आपापल्या क्षमतेप्रमाणेच वजन वापरून हा व्यायाम प्रकार करावा कारण या एक्सरसाईजमुळे स्नायूवर अधिक ताण येतो. Regards
संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या