ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही टीप्स


ऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही टीप्स


ऑफिसच्या ठिकाणी दिवसाची सुरूवात एनर्जीने झाली तरीही कालांतराने मरगळ येते. कामाच्या ठिकाणी ताण किंवा दुपारच्या वेळेस अतिजेवण झाल्यास झोप येते. मग पुढील सारीच कामं रेंगाळतात. मग पहा या झोपेवर कशी मात कराल ? 
स्ट्रेचिंग - 
बसल्या जागी काही स्ट्रेचिंगचे सोपे प्रकार केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. परंतु असे स्ट्रेचिंग तुम्ही आधी नीट एक्स्पर्ट कडून समजून घेऊन मगच ते तुमच्या कामाच्या ठिकाणी अप्लाय करा आणि स्ट्रेचिंग करताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. 
नारळाचं पाणी - 
हल्ली बऱ्याच ऑफिसमध्ये ग्रीन टीची मशीन असते पण मी येथे तुम्हाला नारळाचे पाणी पिण्याचे सजेस्ट करिन कारण नारळाचं पाणी प्यायल्याने दिवसभराची एनर्जी टिकून राहण्यास मदत होते, तसेच क्षीण कमी करायचा असेल तर ग्रीन टी पीणे चांगले.
व्होल ग्रेन - 
उकडलेले मूग, मटकी, चणे अशा धनधान्यांचा आहारात समावेश वाढवल्याने शरीरात एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. म्हणून आपल्या टिफिनमध्ये नेहमी असे उकडलेले कडधान्य ठेवा जे तुम्हाला गरजेला उपयोगी पडेल.

चालणं - 

सतत ७-८ तास बसून काम करण्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होण्यास अडथळा येतो अशा परिस्थितीत कामाच्या दरम्यान वेळ काढून नियमित चालण्याची सवय लावा, चालण्यामुळे आपल्या  शरीरातील हार्मोन्सला चालना मिळून पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळते.Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या