कसं जगायचं आयुष्य? त्यासाठीचं काही सूत्र आहे?

कसं जगायचं आयुष्य? त्यासाठीचं काही सूत्र आहे?


सध्याच्या पिढीसमोर असलेला गंभीर प्रश्न म्हणजे आयुष्य कसं जगायचं? पण ह्यामध्ये प्रत्येकाने आपापले उत्तर शोधून आयुष्य जगण्याचे मार्ग शोधले आहेत आणि ते त्यापद्धतीनंच जगत असतात. खरं आयुष्य जगण्याचं एका महत्वाचे सूत्र आहे जे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लागू आहे, तर ते सूत्र जाणून घेऊया.

तुमचे वय कितीही असले तरी तुमचे विचार हे तरुण असले पाहिजेत, तारुण्याचा अनुभव तुम्ही क्षणी घेतला पाहिजे आणि नेहमीच वर्तमानात राहून जणू उद्याचा दिवस, उद्याचा क्षण यांची काळजी करण्यापेक्षा वर्तमानातल्या प्रत्येक क्षणाची अनुभुती घेतली पाहिजे. पण प्रत्येक वेळी तो क्षण आनंदाचा असेलच असा नाही पण अशा क्षणही तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि हेच आहे आनंदी आयुष्याचं सूत्र..

या सूत्राच्या जोडीला आणखी एक कृती आपण जाणीवपूर्वक केली पाहिजे.

शरीर आणि मन आनंदी, तरुण ठेवायचं तर तुमच्या शरीराला जाणीवपूर्वक काही सवयी ह्या लावून घेतल्याच पाहिजे जसे की काही जण व्यायाम करतात, कोणी कुठल्या तरी छंदाला वाहून घेतात.


अर्थातच व्यायाम हा तर केलाच पाहिजे पण त्याचा जास्त अतिरेक न करता तुमच्या वयाला झेपेल असा व्यायाम किंवा चालणे मात्र प्रत्येकानं अवश्य केले पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला नुसतं तंदुरुस्तच राखणार नाही, तर तुम्हाला तारुण्यही बहाल करील. तुम्ही आहेत त्या वयापेक्षा नक्कीच तरुण दिसाल आणि ह्याच बरोबर त्याला योग्य आहाराची, ६-८ तासांच्या झोपेची जोडही तितकीच महत्वाची आहे तर मग तुम्हालाही तरुण व्हायचं असेल तर आतापासूनच संकल्प करा आणि ह्या सोप्या पद्धतीने स्वतःच्या नवीन आयुष्याची सुरवात करा.
Post a Comment

0 Comments