रागाला औषध काय?

रागाला औषध काय?


जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला कधी रागच आला नाही, ते व्यक्त करण्याचे प्रकार प्रत्येकाचे वेगळे आहेत. एक ह्यात अशी पद्धत आहे की त्या व्यक्तीला वाटते की आपली या जगात काहीच किंमत नाही आणि ती पटवून देण्यासाठी असे लोक कायम प्रत्येकाशी वाद घालताना आढळून येतात. एक दुसरा प्रकार आहे ज्यात असे लोक आहेत जे रागाच्या भरात इतरांना शारीरिक इजा पोहोचवण्याचं काम करतात आणि दुर्दैवाने ह्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढू लागले आहे आणि ही एक खरोखरच चिंतेची बाब आहे. असेही काही लोक आहेत ज्यांना असे वाटते की प्रत्येक कारणासाठी आपणच  दोषी आहोत म्ह्णून त्या दबावाखाली असे लोक रागराग करून , विक्षिप्त वागतात. कधी कधी तर काही लोकांचा राग इतका अनावर होतो की  ते स्वत:ला शारीरिक इजा पोहोचवतात. तर काहींना आपण एकटेच आहोत असे वाटत राहते आणि त्यांना आपलं कोणी नसल्याचं सारखं वाटत असतं. ह्या अशा विविध प्रकारे लोक राग व्यक्त करत असतात त्यामुळे अशा लोकांकडून काही नकारात्मक पाऊल उचलण्याचीही शक्यता असते. म्हणूनच अशा लोकांबरोबर प्रेमाने, आपुलकीने वागलं पाहिजे व त्यांना रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

परंतु रागावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे आणि त्यासाठी मी इथे काही टिप्स देत आहे:

१. जमेल तेव्हा किंवा फावल्या वेळात तुमचे छंद झोपासा आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि हा काही शेवट नाही असे सारखे मनाला सांगा आणि खचून न जाता नव्या जोमाने पुढे जा.

२. जिथे खरंच तुमची चूक असेल तर क्षमा मागा, पण प्रत्येक गोष्टीसाठी क्षमा मागण्यापेक्षा तुमची चूक नाही हे इतरांना पटवून द्या. तसेच भूतकाळात केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत ह्याची जाणीवपूर्वक पुरेपूर काळजी घ्या.

३. तुम्ही आतापर्यंत काय चुका केल्या आणि किती बरोबर वागलात याची नोंद ठेवा अर्थातच एक डायरी बनवा जेणेकरून तुम्हालाच तुमचे वागणे सुधारलेले दिसून येईल तसेच एक कायम लक्षात ठेवा तुमची स्पर्धा ही दुसऱ्यांशी नसून स्वत:शीच आहे ह्याची कायंम जाणीव असू द्या.

४. तुम्ही किती चांगले आहात, हे इतरांना पटवून देण्यापेक्षा ते स्वत:च्या मनावर ठामपणे बिंबवा दुसऱ्यांना ते आपोआपच कळेल.

 

Regards 


https://www.google.co.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या