मन करा रे प्रसन्न!

मन करा रे प्रसन्न!

आज आपण जी काही ध्येय गाठण्यासाठी सगळी धडपड करत आहोत ती करताना आपल्याला अनेक प्रसंग असे उद्भवतात ज्याने नकारात्मक विचार आपल्या मनात डोकवतात. मात्र आता या सगळ्या नकारात्मक गोष्टींना तुम्ही सहज बाय-बाय करु शकता.

व्यक्ती कोणीही असो लहान असो व मोठा, श्रीमंत असो व गरीब, प्रत्येकाचे आयुष्य हे यश-अपयश, सुख-दु: ख, सकारात्मकता-नकारात्मकता या सगळ्या गोष्टींचं मिळून बनलेलंच आहे. जीवनात सगळंच आपल्या मनासारखं घडलं तर प्रत्येकालाच आनंद होतो पण यश मिळवायचं असेल तर मेहनत ही घ्यावीच लागते ह्यामध्ये कधी मनासारखं, अपेक्षित यश मिळतं तर कधी आपली मेहनत कमी पडते. आपले ध्येय गाठण्यासाठी ही सगळी धडपड करत असताना अनेक प्रसंग असे उद्भवतात ज्याने नकारात्मक विचार आपल्या मनात डोकवतात आणि ह्याला जगातली कुठलीच व्यक्ती अपवाद नाही हे तर सगळ्यांच्या बाबतीत होते. मात्र ह्या नकारात्मक गोष्टीवर काही थोड्याच लोकांना विजय मिळवता येतो तर बरेच जण अपयशी होतात पण आता मात्र  सगळ्या नकारात्मक गोष्टींना तुम्ही  बाय-बाय करू शकता.

आपल्या आयुष्यात आता नव्याने एक सकारात्मक सुरुवात कशी कराल याच्या काही टिप्स खास माझ्या वाचकांसाठी मी येथे घेऊन आलो आहे –


ध्यानधारणा किंवा योग करा

सध्या जागतिक पातळीवर सर्वच ठिकाणी आपल्या भारतीय योग अभ्यासाचे महत्व प्रचंड वाढलेले आहे, त्यामुळे मनाला ताण देणाऱ्या गोष्टीपासून दूर जायचं असेल तर योग आणि ध्यानधारणा हा त्याच्यावरचा उत्तम पर्याय आहे ज्याने मानसिक तसंच शारीरिक आराम मिळण्यास खूपच मदत होते.

भरपूर हसा.
खळखळून, मनमुराद शेवटचं कधी हसलात हे तुम्हाला आठवतं का? सध्याच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या आयुष्यात बरेच जण हसण्याचेच विसरले आहे आणि हसण्याने ताण हलका होऊन आयुष्यही वाढतं हे तर सर्वच जाणतात, त्यामुळे मनमुराद हसा ह्यासाठी कॅमेडी सीरिअल पहा किंवा लाफ्टर क्लबला जॉईन व्हा.


सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात
जेव्हा नकारात्मक विचार मनात डोकवायला लागतील तेव्हा सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात वेळ घालवा किंवा वेळ काढून मोटिवेशनल प्रोग्रॅमला जा, जेणकरुन तुम्ही नकारात्मक विचारांच्या विळख्यातून बाहेर पडाल.

सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करा.
तसं पाहायला गेलं तर हे वर वर कठीण वाटते पण सरावाने हे नक्कीच शक्य आहे, एकदा का नकारात्मक विचारांनी आपल्या मनात घर केलं आणि आपण त्याच विचारात राहिलो तर आयुष्याची आर्धी लढाई आपण तिथंच हारतो. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचारसरणीचा जाणीवपूर्वन अवलंब करा.


बळी पडू नका.
स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या कारण तुम्हीच तुमचं आयुष्य घडवता. कोणत्याही नकारात्मक विचारांना बळी पडू नका.


इतरांना मदत करा.
आजकाल पाहायला गेलं तर बरेच जण फक्त स्वतःचा विचार करताना दिसतात, माझं कसं चांगलं होईल ह्यावर जास्त लक्ष असतं म्हणूनच केवळ स्वत:बद्दल विचार करणं सोडा आणि थोडं इतरांसाठी देखील  जगा. इतरांना मदत करून समाजोपयोगी कार्य करा कारण इतरांसाठी काही केल्याचा आनंद तुम्हाला खूप काही शिकवून जाईल.


पुढे चला
व्यक्ती कोणीही असो कोणीच सगळ्या बाबतीत परफेक्ट नसतो हे आधी लक्षात घ्या. स्वत:च्या चुकांमधून काहीतरी शिका , तीच चूक पुन्हा न करता पुढे चला, यश तुमचेच असेल.


गाणं म्हणा
तुमचा आवाज कसाही असो पण गाणं म्हणण्याने ताण हलका होतो, हे खरं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल तेव्हा गाणं म्हणा ह्याने नक्कीच बरे वाटेल अगदीच नाही तर आवडती गाणी ऐका.

स्वत:चं कौतुक करा
तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात गाठलेल्या सर्व ध्येयांची यादी करून त्यासाठी स्वत:चं वेळोवेळी कौतुक करा, कारण आपली स्पर्धा ही इतर कोणाबरोबर नसून आपल्याशीच आहे हे कायम लक्षात असुद्या.


सुविचार वाचा.
सकारात्मक विचार आणि यशस्वी व्यक्तींचे अनुभव सतत वाचत राहा. यातून तुम्ही खूप काही शिकाल.Regards

 http://slideplayer.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या