मॉर्निंग वॉकचे फायदे…

मॉर्निंग वॉकचे फायदे…


संपूर्ण जगात सगळ्यात सोप्पा आणि कुठलेही पैसे नं देता करता येणारा व्यायाम असेल तर तो म्हणजे चालणे आणि जर आपण सकाळी लवकर उठून घराच्या बाहेर चालायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. कारण रोजच्या चालण्याने आपण दीर्घायुष्यी होऊन आपले आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य होईल. तर आता आपण चालण्याबद्दल थोडे जाणून घेऊयात:

जगात कुठेही एकही पैसा खर्च न करता होणारा व्यायाम प्रकार म्हणजे चालणे

कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार

कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा

शरीर तंदुरुस्त आणि चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार

सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होवून दिवस चांगला जातो

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळ्च्या चालण्याने कोवळ्या उनातून मिळू शकते

चालण्यामुळे एकाचवेळी शारीरिक मानसिक व्यायाम होऊन शरीर निरोगी राहते
सतत काम करून आलेला थकवा चालण्यामुळे दूर होतो
चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होतो तसेच झोपही चांगली लागते
मनाच्या एकाग्रतेसाठी व चिंतनासाठी चालणे फायदेशीर ठरते तसेच वजन कमी करण्यासही मदत होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होते.
चालण्यामुळे पचनक्रिया सुधारून पचनाचे विकार कमी होण्यास मदत होते.
झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो तसेच नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी असते.
नियमित चालणाऱ्यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढून अशा व्यक्तींना पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते

नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारून हाडांची मजबुतीही वाढते.

नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात तसेच चालण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊन काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचावही होतो.

नियमित चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत होते तसेच सरासरी आयुष्य तीन वर्षांनी वाढण्यास मदत होते म्हणूनच चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

चालण्याचा व्यायाम करण्यामध्ये कुठेही, कधीही वय आड येत नाही. प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे चालू शकतो व आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो.

Regards



संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

Post a Comment

0 Comments