वाढता वाढता वाढे!!!

वाढता वाढता वाढे!!!


सध्या पाहायला गेले तर बरेच जण हे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत.पोटाची चरबी कमी करण्यावर त्यांचा जास्त भर आहे. मात्र, काही दिवसांनी इतर शरीराचं वजन कमी होत असल्याचं दिसून येते पण पोटाचा घेर तितकाच राहतो आहे. जीम ट्रेनर सांगतात, की केवळ एका भागाचा वेटलॉस होत नाही. फुल बॉडी वेट लॉसला महत्त्व आहे. असं का?  मग अशातच लोकांना हात-पाय बारीक दिसतील आणि पोटाचा घेर तसाच राहाण्याची भीती वाटते. यावर मी तुम्हाला सोप्या भाषेत मार्गदर्शन करणार आहे.

 

सध्याच्या आधुनिक जीवनशैली मुळे अनेकांचा पोटाचा घेर वाढताना दिसून येत आहे, स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही हा प्रकार होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. पोटावर जमलेली चरबी हटवणं अवघड आहे; पण अशक्य नक्कीच नाही. म्हणूनच योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि सबुरी / संयम ह्यांचे योग्य पालन हे करायलाच हवे कारण पोटावर जमलेली चरबी ही मधुमेह, हृदय, स्मृतीभ्रंश, रक्तदाब अशा भविष्यकाळात होऊ शकणाऱ्या अनेक आजारांची निर्मिती असते.

 

तुमचा पोटाचा घेर बाकी शरीराच्या मानानं जास्त आहे म्हणूनच तुम्ही खालील व्यायाम पद्धती आणि आहार यांची सांगड घालणं आवश्यक आहे.

व्यायामप्रकार

१.जगातला सगळ्यात सोप्पा व्यायाम म्हणजे नियमित आणि 

जमेल तस जलद चालणं किंवा

२.टेकडी चढणं

३.पोहणं, सायकल चालवणं

ह्या पाकी कुठलाही व्यायामप्रकार किमान ४० मिनिटं प्रतीदिवस असं आठवड्यातून किमान पाच दिवसतरी करा.


स्थिर व्यायामप्रकार


खाली दिलेले व्यायामप्रकार हे योग्य मार्गदर्शखालीच करावेत

१.योगासनं, पवनमुक्तासन, धनुरासन, भुजंगासन

२.सूर्यनमस्कार, किमान बारा

३.पुशअप्स


वर दिलेले व्यायाम एकाच दिवशी विभागून करा आणि सावकाश करा. श्वासावर लक्ष असू द्या. व्यायामाचा अवधी हळूहळू वाढवा. वारंवार किंवा रोज पोटाचा घेर मोजण्यापेक्षा १५ दिवसांतून एकदा मोजा.

आहारामध्ये खालील टाळा


१.  गोड पदार्थ


२. मैद्याचे पदार्थ


३. सॉफ्टड्रिंक


४. जंक फूड


५. प्रक्रिया केलेले पदार्थ


आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, कोशिंबीर, उसळी, साय काढलेलं दूध, फुलका किंवा भाकरी यांचा आवर्जून समावेश करा. एकदम भरपूर जेवण्यापेक्षा आहार दिवसातून चारवेळा विभागून घ्या. रात्रीचे जेवण कमी करा शक्यतो पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळा, रात्रीचं जेवण आणि झोपायची वेळ यामध्ये किमान दोन तासांचं अंतर असावं म्हणून लवकर जेवणाची सवय लावा. रात्री किमान सात तास झोप मिळणं आवश्यक आहे कारण अपुरी झोप वजन वाढायला तसेच मानसिक आरोग्य बिघडायला कारणीभूत ठरते.

 

खालील गोष्टींपासून सावध राहा.


१.थोड्या कालावधीत भरमसाठ वजन कमी करणाऱ्यांना जाहिरातींबद्दल नीट माहिती काढूनच मग योग्य तो निर्णय घ्या, जमल्यास अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष करा.

२. वजन कमी करणाचे कोणतेही शॉर्टकट नसून आहार नियंत्रण आणि व्यायाम हा अंतिम आणि शाश्वत उपाय आहे हे लक्षात घ्या

३. व्यायाम, आहार आणि औषधानं अपेक्षित परिणाम न मिळाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. एक लक्षात घ्या, की  सुखवस्तू जीवनशैली बदलल्यास म्हणजेच जागच्या जागी काम करणे टाळल्यास पोटावरील चरबीला कायमचं कमी करता येतं.

Regards

 

https://truweight.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या