काम करा चाळीस तास

काम करा चाळीस तास


आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकासमोर कामाची उत्तुंग आव्हानं निर्माण केली आहेत; आणि त्यांचा सामना करण्यासाठी तज्ञांच्या मते ४० तास आठवड्यातून द्यावेत आणि बाकीचा वेळ आपल्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी वापरावा.

आजच्या ह्या अशा जीवनशैलीमुळे वाढता तणाव, असाइनमेंट्स, डेडलाइन्स आणि या सगळ्याशी जोडलेली पगारवाढ, अशा यच्चयावत कारणांमुळे खासगी क्षेत्रात काम करणारा सर्व स्तरातला कार्यकारी वर्ग कमालीच्या दबावाखाली आज वावरताना दिसत आहे तसेच प्रमाणाबाहेर कामाचे तासही त्यांच्या मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम करत आहेत. अशातच वजनवाढ, उच्च रक्तदाब, मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखी, दृष्टिदोष, मानसिक चिंता, नैराश्य, निद्रानाश अशा थेट जीवनशैलीशी संबंधित आजारांना आज कित्येक लोकांना सामोरे जावे लागत आहे. अति काम आणि कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती कमजोर पडून, सर्दी-खोकल्यासारखे आजारही वरचेवर होताना दिसून येत आहेत
अशा जीवनशैलीशी निगडित वाढत चाललेल्या पेशंटच्या संख्येवर उपचार करताना डॉक्टर म्हणतात, ‘काम कमी करा. जरा आराम करा.’ काम कमी म्हणजे किती कमी? आठवड्याला किती तास? हे कसं ठरवणार? तज्ञांच्या एका संशोधनानुसार, आठवड्याला फक्त ४० तास काम केलं, तरच तब्येत उत्तम राहते. ४० तासांपेक्षा जास्त किंवा ३० तासांपेक्षा कमी काम केलं, तर ते आरोग्याला हानिकारक ठरू शकतं.

या संशोधनात असं जाहीर केलं आहे, की पुरुषांनी आठवड्यात ४० ते ४५ तास काम करायला हरकत नाही. पण स्त्रियांनी ३४ तासच काम करावं; कारण त्यांना रोज किमान - तास घरातल्या कामांची जबाबदारी सांभाळावी लागते. या संशोधकांनी आवर्जून नमूद केलं आहे की, जरी स्त्रियांचे ऑफिसच्या कामाचे तास जरी कमी असावेत तरी घर आणि ऑफिस ह्या अशा दोन्ही आघाड्यांवर स्त्रिया ह्या तसूभरही कमी नसतात.

आठवड्याचे सहा दिवस रोज ऑफिसमध्ये  १० ते १२ तास काम करणाऱ्या व्यक्ती आज आपल्या देशातही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात, भरपूर कष्ट केल्याशिवाय यश आणि पैसा मिळत नाही, असं मानणारा खूप मोठा वर्ग येथे आज आहे आणि या वर्गाला स्वतःच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याच्या वेळांकडे, विश्रांतीकडे म्हणावं तेवढं लक्ष देता येत नाही. आयुष्यातील असंख्य सुखाच्या अनेक लहान लहान क्षणांना ते दूर लोटतात. आपल्या कुटुंबाकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो, अति कामाच्या तणावामुळे ते सतत थकलेले असतात आणि चाळिशीतच वृद्ध दिसू लागतात आणि बरीच दुखणीही पाठीशी असतात.अशावेळेस या अल्पवयातच नैराश्य आल्यास आश्चर्य वाटायला नको.  

आठवड्यात एकूण फक्त ४० तास काम करा, याचा अर्थ उरलेले तास झोपा काढा असा बिलकुलही होत नाही तर बाकीच्या वेळेत जीवनातील सर्व क्षेत्रात सहभागी होऊन आनंद मिळवा. आपले काम संपल्यावर उर्वरित वेळ विश्रांती, मुलांबरोबर किंवा कुटुंबासमवेत आणि मित्रमंडळीसह आनंदात व्यतीत केला पाहिजे, तसेच तुम्ही आवडते छंद जोपासणं, अधिक अपेक्षित आहे. खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे आणि आपल्या दिनचर्येत स्वतःसाठी आणि चिंतनासाठी वेळ आवर्जून काढावा.

थोडक्यात काय, तर  आजच्या जीवनशैलीनं प्रत्येकासमोर कामाची उत्तुंग आव्हानं निर्माण केली असल्याने त्यांच्याशी झगडण्यासाठी आठवड्यात ४० तास द्यावेत. बाकीचा वेळ आपल्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी वापरावा. आजकाल बऱ्याच कंपन्या मध्ये तासाचे वर्किंग कल्चर आले असून आठवड्यातले दिवस काम चालते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होत आहे.
Regards

 

 


https://www.techinasia.com  

Post a Comment

0 Comments